लातूर : २०१५-१६ मध्ये दुष्काळ निवारण आणि शासनाच्या योजना प्रभावीपणे राबविल्याबद्दल उत्कृष्ट जिल्हाधिकारी म्हणून पांडुरंग पोले यांचा मुंबई येथे बुधवारी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. जिल्हाधिकारी पांडुरंग पोले यांनी लातूर जिल्ह्यात जलयुक्त शिवार योजना प्रभावीपणे राबविली. या योजनेत लोकांचा सहभाग वाढविला. गतवर्षी जलयुक्त शिवार योजनेत २००२ गावांमध्ये नद्या-नाल्यांचे खोलीकरण व सरळीकरण करण्यात आले. मांजरा, तावरजा नदीतील खोलीकरण व रुंदीकरणाच्या कामात मोठा लोकसहभाग वाढविण्यात आला. अरुंद झालेल्या नदीपात्रात मोठे काम करून पाणी साठवण क्षमता वाढविली. याची दखल घेत राज्य शासनाने जिल्हाधिकारी पांडुरंग पोले यांना उत्कृष्ट जिल्हाधिकारी म्हणून पुरस्कार देण्यात आला. यावेळी महसूल मंत्री एकनाथ खडसे, प्रधान सचिव स्वाधीन क्षेत्रीय यांची उपस्थिती होती. (प्रतिनिधी)
उत्कृष्ट जिल्हाधिकारी म्हणून शासनाकडून पोले यांचा गौरव
By admin | Published: April 22, 2016 12:16 AM