शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभेला बारामतीतून कोणी तिकीटच मागितले नाही; युगेंद्र पवारांना उमेदवारी का दिली, सुप्रिया सुळेंनी सांगितले
2
सुनिल केदारांनी महाविकास आघाडीचा विश्वासघात केला; ठाकरेंच्या भास्कर जाधवांची टीका
3
टी-२० मालिका : युवा भारतीयांची ‘कसोटी’, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध छाप पाडण्याची संधी
4
उद्धव ठाकरे यांची पंचसूत्री नव्हे तर थापासुत्री, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची टीका
5
चॅम्पियन्स ट्रॉफी : पाकिस्तान हायब्रिड मॉडेलसाठी तयार, भारताचे सामने यूएईमध्ये रंगण्याची शक्यता
6
डब्ल्यूपीएल : हरमन, स्मृती, जेमिमा रिटेन
7
महाराष्ट्र को लुटेंगे, दोस्तोंको बाटेंगे हा भाजपचा अजेंडा, उद्धव ठाकरे यांचा घणाघात; सामान्य जनभावना या सरकारविरोधात
8
मला तो पक्ष नको, चिन्ह नको अजित पवारांना लखलाभो; सुप्रिया सुळेंनी बंडापूर्वी काय घडले ते सांगितले...
9
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या कारवर हल्ला; नांदेडच्या कंधार तालुक्यातील घटना
10
जम्मू काश्मीर: दहशतवाद्यांचा गावातील रक्षण समितीच्या सदस्यांवर हल्ला; दोघांची हत्या
11
नादाला लागू नका, यापुढे मराठा आरक्षणावर बोलू नका; मनोज जरांगे यांचा राज ठाकरेंना इशारा
12
"एकदा संधी द्या, नालायक ठरलो तर पुन्हा तोंड दाखवणार नाही", राज ठाकरेंचे भावनिक आवाहन...
13
काँग्रेस पक्ष संकटात असताना अशोक चव्हाण अटकेच्या भीतीने भाजपात गेले; नाना पटोलेंचा निशाणा
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी; राष्ट्रवादीने दिली पोलीस आयुक्तांकडे तक्रार
15
पाकिस्तानी सैन्य प्रमुखांचा पाकिस्तानातच अपमान; इराणी गार्डनी रोखले, बैठकीलाच जाऊ देईनात
16
IPL 2025: KKRने केली मोठी चूक? रिलीज केलेल्या 'या' २ खेळाडूंनी केला 'सुपरहिट धमाका'
17
"भाजपने डॉग स्क्वाड पाळलेत"; जयंत पाटलांचा सदाभाऊ खोतांवर पलटवार; फडणवीस यांचं नाव घेत म्हणाले...
18
"राजसाहेब तुम्हाला खरंच बडव्यांनी घेरलंय, सावध रहा"; ठाकरे गटात गेलेल्या अखिल चित्रेंचा इशारा
19
AUS vs IND : 'ते' विसरा त्यांनी १५ वर्षांत स्वत:ला सिद्ध केलंय; कपिल देव यांची विराट-रोहितसाठी बॅटिंग
20
Maharashtra Election 2024: कोणत्या मतदारसंघात काँग्रेसच्या नेत्यांनी केलीये बंडखोरी?

चिथावणीखोर व्हिडिओ प्रसारित करून शहराची शांतता भंग केल्याबद्दल हर्षवर्धन जाधवविरोधात पोलिसांची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2019 11:29 PM

चिथावणीखोर व आक्षेपार्ह व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित केल्याप्रकरणी आमदार हर्षवर्धन जाधव यांच्याविरुद्ध पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा नोंदविला आहे. शिवाय त्यांच्या व्हिडिओची तपासणी करून आणखी कडक कारवाई करण्याची तयारी पोलीस प्रशासनाकडून सुरू असल्याची माहिती समोर आली.

औरंगाबाद : चिथावणीखोर व आक्षेपार्ह व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित केल्याप्रकरणी आमदार हर्षवर्धन जाधव यांच्याविरुद्ध पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा नोंदविला आहे. शिवाय त्यांच्या व्हिडिओची तपासणी करून आणखी कडक कारवाई करण्याची तयारी पोलीस प्रशासनाकडून सुरू असल्याची माहिती समोर आली.औरंगाबाद लोकसभा मतदारसंघासाठी २३ एप्रिल रोजी मतदान झाले. त्या दिवशी एक व्हिडिओ क्लीप सोशल मीडियावर व्हायरल झाली. या व्हिडिओतील तरुण महापुरुषांबद्दल आक्षेपार्ह विधान करतो. या व्हिडिओमुळे नागरिकांच्या भावना दुखावल्याने त्या तरुणावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली होती. पोलिसांनी झटपट कारवाई करून त्या तरुणाविरुद्ध सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविला आणि त्यास अटकही केली. ही कारवाई केल्यानंतर शिवस्वराज्य पक्षाचे उमेदवार हर्षवर्धन जाधव यांनी एक व्हिडिओ प्रसारित करून ‘आक्षेपार्ह व्हिडिओ तयार करणारा एमआयएमचा कार्यकर्ता असल्याने एमआयएमने जाहीर माफी मागावी,’ अशी मागणी केली. माफी न मागितल्यास शहरातील एमआयएमचे कार्यालय फोडून टाकण्यात येईल. याकरिता सर्वांनी शनिवारी सायंकाळी चिकलठाणा विमानतळावर यावे, असे आवाहन केले होते. जाधवांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने शहराचे वातावरण तापले. पोलीस यंत्रणा सतर्क झाली. पोलिसांनी त्यांच्याविरोधात अदखलपात्र गुन्हा नोंदविला. तसेच त्यांच्या व्हिडिओची तपासणी करून सायबर अ‍ॅक्टनुसार कारवाई करण्याची तयारी सुरू केल्याचे वरिष्ठ सूत्रांनी सांगितले.आमदार इम्तियाज जलील यांनी व्हिडिओ प्रसारित करून त्या तरुणाचा एमआयएमशी काहीही संबंध नसल्याचे स्पष्ट केले. शिवाय कोणतेही महापुरुष विशिष्ट समाजाचे नाहीत. त्यांच्यासह सर्व महापुरुष आमचेही आहेत, असे नमूद केले.हर्षवर्धन यांचा दुसराही व्हिडिओआ. जलील यांनी त्या तरुणाचा एमआयएमशी संबंध नसल्याचे जाहीर केल्यानंतर हर्षवर्धन जाधव यांनी नागरिकांना शांततेचे आवाहन केले. एमआयएमने तलवार मॅन केल्याने आपल्या लढ्याला यश आल्याचे स्पष्ट करीत आंदोलन मागे घेतल्याचे सांगितले.

टॅग्स :Aurangabad city policeऔरंगाबाद शहर पोलीसCrime Newsगुन्हेगारीWhatsAppव्हॉट्सअ‍ॅप