शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट
2
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
आधी ‘बटेंगे तो कटेंगे’ला विरोध, आता मोदींच्या सभेला दांडी, अजित पवारांच्या मनात चाललंय काय?  
4
IND vs SA: मालिका जिंकण्यासाठी मोठा निर्णय? Rinku Singh संघाबाहेर, 'या' स्टार खेळाडूला संधी
5
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
6
विशेष लेख: गणिते बिघडली, झोप उडाली.. युती की आघाडी?
7
पोलिसांनी शूटरलाच विचारले ‘कोणाला पाहिलं काय?’; बाबा सिद्दिकी प्रकरणातील धक्कादायक माहिती उघड
8
गजकेसरी योगात सूर्य-शनी गोचर: ७ राशींना अनुकूल, सकारात्मक काळ; लक्ष्मी कृपा अन् यश प्रगती!
9
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
10
तरुणीने बोलावले म्हणून लॉजवर गेला; मात्र नंतर तरुणासोबत घडला धक्कादायक प्रकार!
11
अग्निशमन दलातील माणसांचं वेदनादायी आयुष्य! 'अग्नी'चा ट्रेलर; जितेंद्र जोशी-सई ताम्हणकरची खास भूमिका
12
... म्हणून मोदी सरकारला आहे सरकारी कंपन्यांचा अभिमान, जाणून घ्या गेल्या ९ वर्षांत किती झाली प्रगती
13
Maharashtra Election 2024 Live Updates: 'लाडकी बहीण'सारख्या योजनांचे सरकारने नीट नियोजन केलं आहे- मुख्यमंत्री शिंदे
14
सोयाबीनला सहा हजाराचा हमीभाव देणार; PM मोदींची मोठी घोषणा
15
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
16
Ola Electric CCPA Notice : Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
17
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
18
"एक माणूस म्हणून तो...", इब्राहिमसोबतच्या नात्यावर पलक तिवारीने केलं होतं भाष्य
19
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
20
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!

बंदूकसह व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करणारा पोलिसांच्या ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2021 4:02 AM

गौतम बाबासाहेब बनकर (रा. मिसारावाडी) आणि शस्त्र परवानाधारक राजू शंकर खरात अशी आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी सांगितले की, आरोपी ...

गौतम बाबासाहेब बनकर (रा. मिसारावाडी) आणि शस्त्र परवानाधारक राजू शंकर खरात अशी आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी सांगितले की, आरोपी खरात हे माजी सैनिक असून, ते जुना मोंढ्यातील अजिंठा बॅंकेचे सुरक्षारक्षक म्हणून नोकरीला आहेत. त्यांच्याकडे परवाना असलेली बारा बोअरची बंदूक आहे. दोघेही शेजारी राहतात. बनकर हा खरात यांच्या मुलाचा मित्र असल्यामुळे त्याचे त्यांच्या घरी येणे-जाणे असते. फेब्रुवारीत खरात यांनी बंदूक साफसफाई करण्यासाठी घरी नेऊन ठेवली होती. तेव्हा त्यांची नजर चुकवून बनकरने ही बंदूक घेतली आणि मोबाइलवर एक व्हिडिओ क्लिप बनविली. त्यात तो सिनेस्टाईल एका घरातून बाहेर येतो आणि बंदूक दाखवून एका ओट्यावर बसतो. ही व्हिडिओ क्लिप त्याने काही दिवसांपूर्वी व्हॉट्सॲपवर व्हायरल केली. याविषयी गुन्हे शाखेला माहिती मिळताच साहाय्यक फौजदार विठ्ठल जवखेडे, शेख हबीब, विजय निकम, शिवलिंग होणराव, गोविंद पचरंडे आणि गायकवाड यांनी आज दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले. शस्त्र परवान्याचे उल्लंघन करणे आणि कोणतेही प्रशिक्षण नसताना बंदूक हाताळल्याचा गुन्हा पोलिसांनी सिडको ठाण्यात नोंदविला आहे.