औरंगाबाद: आकाशवाणी चौकात ७ जानेवारी रोजी रात्री अपघात झाल्यामुळे मद्यपी पोलिसाच्या कमरेचे पडलेले सरकारी पिस्टल आणि दहा काडतुसे पळविणाºयाला तरुणालागुन्हेशाखेने अटक केली. ५एप्रिल रोजी सेवन हिल येथील एटीएम फोडण्यासाठी याच पिस्टलमधून त्याने दोन गोळ्या झाडल्याची कबुली त्याने दिली. आरोपीकडून पिस्टल आणि आठ काडतुसे जप्त करण्यात आली.
अजय जितेंद्र कांडे (वय १९,रा. भमनगर, गेवराई, बीड, ह.मु. बालाजीनगर)असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. पोलीस उपायुक्त दीपाली धाटे-घाडगे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, पोलीस मुख्यालयातील पोलीस काँन्स्टेबल अमित शिवानंद स्वामी यांनी रूम बदलल्यामुळे भोईवाडा येथील खोलीतील सामान मित्रांच्या रिक्षातून टि.व्ही.सेंटर येथे नेत होता. अमितने भरपूर मद्य प्राशन केल्यामुळे तो रिक्षातच झोपला. रिक्षाचालक मित्रही दारूच्या नशेत असल्याने शिवाय त्यांनाही त्याची नवीन रूम माहित नसल्याने ते पुंडलिकनगर रस्त्यावरून परत भोईवाड्याकडे जाऊ लागले. आकाशवाणी चौकात त्यांच्या रिक्षाला अपघात झाला. यावेळी दारूच्या नशेत तर्र असलेल्या अमितच्या कमरेचे सर्व्हिस पिस्टल आणि दहा काडतुसे रस्त्यावर पडली. त्याचवेळी चौकात बसलेल्या अजयने पिस्टल आणि काडतूसे उचलून तेथून पोबारा केला.
याप्रकरणी जवाहरनगर ठाण्यात पिस्टल हरवल्याची तक्रार नोंद करण्यात आली होती. तेव्हापासून पिस्टल पळविणाºयाचा पोलीस शोध घेत होते. दरम्यान ५ एप्रिल रोजी सेवन हिल येथील एसबीआयच्या एटीएमवर दोन गोळ्या झाडून मशीनमधील रोकड लुटण्याचा प्रयत्न केला होता. हा चोरटा तेथील सीसीटिव्हीत कैद झाला होता. याप्रकरणी पुंडलिकनगर ठाण्यात गुन्ह्याची नोंद झाली होती. पोलिसांचा तपास सुरू असताना अजय कांडेकडे पिस्टल असल्याची माहिती मिळाली. मात्र तो चकमा देत होता. शुक्रवारी तो घरी आल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
त्यानंतर पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद, उपायुक्त घाटे-घाडगे, सहायक आयुक्त नागनाथ कोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.नि.मधुकर सावंत, सपोनि राहुल सुर्यतळ, कर्मचारी संतोष सोनवणे, बापू बावस्कर, लालखाँ पठाण, नंदलाल चव्हाण, योगेश गुप्ता, रितेश जाधव, विजयानंद गवळी, संजीवनी शिंदे, चालक अनिल थोरे यांनी त्याला पकडले. त्यावेळी त्याच्या कमरेला पिस्टल आणि काडतुसे होते.आरोपीविरोधात विविध गुन्हेआरोपी अजय कांडेविरोधात बीड गेवराई येथे आणि जवाहरनगर ठाण्यांतर्गत दुकान फोडण्याचे गुन्हे आहेत. पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी बोगस टि.सी. त्याने सादर केल्याचे समोरआले.