नळदुर्ग : शिव-बसव-राणा सार्वजनिक जयंती मिरवणूकदरम्यान पोलिसांनी मिरवणुकीतील काही तरूणावर लाठीमार केला़ ही घटना शनिवारी रात्रीच्या सुमारास घडली असून, पोलिसांकडून झालेल्या मारहाणीबाबत संताप व्यक्त होत आहे़शिवजयंतीचे औचित्य साधून नळदुर्ग शहरात शनिवारी शिव-बसव-राणा सार्वजनिक जयंती उत्सव साजरा करण्यात आला. समितीच्यावतीने शनिवार सायंकाळी शिव-बसव-राणा यांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक काढण्यात आली. सायंकाळी ६ वाजता भवानी चौकातून मिरवणुकीस प्रारंभ होवून मिरवणूक मुख्य रस्त्यावरून चावडी चौकातून मराठा गल्ली, काझी गल्ली, किल्लागेटमार्गे मुख्य मार्गावरून भवानी चौकात येत होती़ रात्री ९ वाजता चावडी चौकात मिरवणुकीपुढे गीत लावून नाचण्याच्या कारणावरून काही युवकात बाचाबाची झाली़ त्यावेळी बंदोबस्तावर असलेल्या शीघ्र पोलीस दलाच्या कर्मचाऱ्यांनी परिस्थिती नियंत्रणात राहण्यासाठी लाठीमार केला़ पोलिसांनी केलेल्या लाठीमाराचा शहरवासियांनी निषेध नोंदविण्यात आला़ तसेच एसबीआर ग्रुपच्या व शहरवासियांच्या वतीने रविवारी नळदुर्ग पोलीस ठाण्याचे निरीक्षक एम. एस. सय्यद यांना युवकांवर लाठीमार करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली़ निवेदनावर विनायक अहंकारी, बसवराज धरणे, सुधीर हजारे, सरदारसिंग ठाकूर, पद्माकर घोडके, उमेश जाधव, शाम कनकधर, अमित शेंडगे, स्वामी आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.(वार्ताहर)
पोलिसांकडून युवकांना मारहाण
By admin | Published: March 19, 2017 11:31 PM