औरंगाबाद : दोन समाजामध्ये तेढ निर्माण करणारा व्हिडिओ तयार करून व्हॉटस्अॅप ग्रुपवर व्हायरल के ल्याच्या गुन्ह्यात सायबर सेलच्या पथकाने आफताब खान नादर खान याला शनिवारी सायंकाळी अटक केली. त्याला प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस. ए. राठोड यांच्यासमोर हजर केले असता त्यांनी २९ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.सायबर सेलचे पोलीस उपनिरीक्षक हेमंत तोडकर हे सोशल मीडियावरील पोस्टची पाहणी करीत असताना १४ वर्षीय मुलगा दोन समाजामध्ये तेढ निर्माण करणारी वक्तव्ये व अश्लील भाषेमध्ये बोलत असलेला व्हिडिओ निदर्शनास आला. या व्हिडिओमुळे शहरातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो म्हणून सायबर सेलने व्हिडिओमध्ये दिसणाºया १४ वर्षांच्या मुलाचा शोध घेऊन त्याला किराडपुरा येथील शरीफ कॉलनीमधून ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने आफताब खान नादर खान याच्या सांगण्यावरून व्हिडिओ काढल्याचे स्पष्ट केले. आफताबने त्याच्या मोबाईलमधून शूटिंग केली आणि व्हॉटस्अॅप ग्रुपवर व्हायरल के ल्याचेही सांगितले.अल्पवयीन मुलाच्या माहितीवरून सायबर सेलच्या पथकाने आफताब खानला (रा. शरीफ कॉलनी) शनिवारी दुपारी ताब्यात घेतले. शनिवारी सायंकाळी त्याला न्यायालयात हजर केले असता सरकारी वकील ए. यू. घुगे यांनी न्यायालयास विनंती केली की, दोन समाजामध्ये तेढ निर्माण करण्यामागचा उद्देश काय, त्याचे इतर कोणी साथीदार आहेत का, याची चौकशी करावयाची आहे. आक्षेपार्ह व्हिडिओ कोणाकोणाला पाठविला, व्हिडिओ व्हायरल करणारा मुख्य सूत्रधार कोण आहे, याचा शोध घ्यावयाचा असल्यामुळे आफताबला पोलीस कोठडी देण्याची विनंती के ली असता न्यायालयाने वरीलप्रमाणे आदेश दिला.------------
आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल करणाऱ्यास पोलीस कोठडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2019 11:26 PM