शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर जरांगेंचा बोलवता धनी कोण? यावर शिक्कामोर्तब होईल"; भाजप नेते प्रविण दरेकर स्पष्टच बोलले 
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: 'शरद पवारांचे नाव घेतलं की अंगावर काटा येतो, त्यांच्यावर बोलणं..."; नरहरी झिरवाळांनी स्पष्टच सांगितलं
3
राज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या १० प्रचार सभा; ८ नोव्हेंबरला पहिली सभा
4
'कोणीही मतदानापासून वंचित राहू नये, साखर कारखाने २१ नोव्हेंबरनंतर सुरु करा'; सदाभाऊ खोतांनी केली मागणी
5
हिट अँड रन प्रकरणात BMW असलेल्या भाजपा नेत्याला पोलिसांनी घेतलं ताब्यात, तपास सुरू
6
लॉरेन्स बिश्नोईच्या नावाने पप्पू यादवांना धमकावणाऱ्याला अटक; मेव्हणीचं सिम वापरुन केला प्लॅन
7
'आयाराम गयाराम' ही म्हण राजकारणात कधी आली?; आमदाराने चक्क एका दिवसात २ पक्ष बदलले
8
सुनील केदार समर्थकांच्या बंडखोरीनं मविआत संताप; ठाकरे-पवारांच्या उमेदवारांना फटका?
9
लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या युवतीच्या मृत्यूचं रहस्य; फ्लॅटमध्ये आढळला मृतदेह
10
देवेंद्र फडणवीसांच्या सुरक्षेत अचानक वाढ, तपास यंत्रणा अलर्ट; नेमकं काय घडलं?
11
मराठा उमेदवारांबाबत रविवारी होणार निर्णय; अंतरवली सराटीत येण्याचे मनोज जरांगेंचे आवाहन
12
वेगवेगळ्या चकमकीत 3 दहशतवाद्यांचा खात्मा; ज्या घरात अडकले होते, त्यालाच जवानांनी लावली आग
13
Rajnath Singh : "अशी परिस्थिती येईल जेव्हा..."; दहशतवादी हल्ल्यांबाबत राजनाथ सिंह यांची मोठी भविष्यवाणी
14
IND vs NZ, 3rd Test Day 2 Stumps: दुसऱ्या दिवशी १५ विकेट्स; तिसऱ्या दिवशीच फुटणार विजयाचे फटाके?
15
केरळमध्ये ट्रॅक साफ करणाऱ्या कर्मचाऱ्यांना ट्रेनने उडवलं; चौघांचा मृत्यू, एकाचा मृतदेह सापडेना
16
Vidhan Sabha Election: मतदान ओळखपत्र नसेल तर काळजी नको, हे १२ पुरावे चालतील; वाचा संपूर्ण लिस्ट!
17
आबांवरील टीकेनंतर नाराजी; शरद पवारांनी अजितदादांना फटकारलं, म्हणाले...
18
पवार कुटुंब एकत्र येणार? आमच्यात फक्त राजकीय मतभेद; सुनेत्रा पवारांचं मोठं विधान
19
सोमवारनंतर मतदारसंघांतील चित्र होणार स्पष्ट; विधानसभेच्या प्रचारासाठी मिळणार फक्त 'इतके' दिवस!
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "दादांना विलन करण्याचा प्रयत्न असेल तर..." ; तटकरेंचा जयंत पाटलांना इशारा

पोलीस आयुक्तालय इमारतीच्या कामाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमीपूजन

By admin | Published: February 27, 2017 7:03 PM

पोलीस आयुक्तालयाच्या नवीन इमारतीसह, पोलीस कर्मचा-यांचे निवासस्थानांसाठी शासनाकडून तब्बल २०० कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे.

ऑनलाइन लोकमत
औरंगाबाद, दि. 27 - पोलीस आयुक्तालयाच्या नवीन इमारतीसह, पोलीस कर्मचा-यांचे निवासस्थानांसाठी शासनाकडून तब्बल २०० कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. या कामाचे भूमीपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विधानसभा सभापती हरीभाऊ बागडे यांच्या हस्ते २ मार्च रोजी करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पत्रकारांना दिली. 
आयुक्त म्हणाले की, शासनाने पोलीस आयुक्त कार्यालयाच्या तीन मजली इमारतीसह, पोलीस आयुक्त, ४ पोलीस उपायुक्त, ८ सहायक पोलीस आयुक्त यांच्या निवासस्थानासाठी २० कोटी रुपये दिले. पोलीस आयुक्त कार्यालयाच्या मागे असलेल्या पोलीस कॉलनी निकृष्ट झाल्याने ही कॉलनी पाडून तेथे ५३२ पोलिसांची निवासस्थाने उभारण्यात येत आहे. या पोलीस कॉलनीसाठी १४०कोटी रुपये प्राप्त झालेले आहेत. या कामाचे भूमीपूजन राज्य पोलीस क्रिडा स्पर्धेच्या प्रसंगी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते केले जाणार होते. परंतु शिक्षक मतदार संघाची आचारसंहिता सुरू असल्याने त्यावेळी हे भूमीपूजन झाले नव्हते. २ मार्च रोजी हा भूमीपूजन समारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होत आहे.  याशिवाय पोलीस उपनिरीक्षक दर्जाच्या अधिका-यांसाठी शासनाने म्हाडाकडून तीसगाव येथील प्रकल्पातील ६५ निवासस्थाने खरेदी केली आहेत. यासाठी मोठा खर्च शासनाने केला. या घरांच्या चाव्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पोलीस अधिका-यांना मिळतील. यावेळी केंद्रीय गृहराज्यमंत्री  सुभाष भामरे,  राज्याचे गृहराज्यमंत्री दिपक केसरकर, राज्याचे पोलीस महासंचालक सतीश माथूर उपस्थित राहणार आहेत. शासनाने २०० कोटी रुपये पोलीस आयुक्त कार्यालयास दिले आहे. २५ वर्षात या आयुक्तालयाच्या इमारतीचे बांधाकम झाले नव्हते.  एवढेच नव्हे तर क्रांती चौक पोलीस कॉलनीचीही अवस्था दयनीय झाल्याने तेथे पोलीस कर्मचा-यांसाठी ४५० निवासस्थाने बांधण्यात येणार आहे. क्रांतीचौक पोलीस कॉलनीसाठी १५० कोटी रुपयांचा निधी मिळणार आहे. याशिवाय तिस-या टप्प्यांतर्गत परेड ग्राऊंड, पोलीस भरती होणारे नवीन मुले आणि मुली यांच्यासाठी स्वतंत्र वसतिगृह, सभागृहाचा प्रकल््प आहे. या प्रकल्पासाठी आणखी १०० कोटी रुपयांचा निधी लागणार आहे.हा प्रस्तावही शासनास लवकरच सादर होईल.