औरंगाबाद : विभागीय आयुक्तांना त्यांच्या कार्यालयात जावून चोळी व बांगड्या देण्यास जाणाऱ्यांना ‘त्या’ कृत्यापासून परावृत्त करण्यासाठी गेलेले पोलीस काॅन्स्टेबल (लोकसेवक) शिरीष गोविंदराव भालेराव यांना मारहाण करून शासकीय कामकाजात अडथळा निर्माण करणारे रऊफ पटेल व कुणाल राऊत या दोघांना सत्र न्यायाधीश व्ही. एम. सुंदाळे यांनी प्रत्येकी एक वर्ष सश्रम कारावास आणि एकूण ८ हजार रुपये दंड ठोठावला.
२९ ऑक्टोबर २०१८ रोजी आरोपी रऊफ पटेल व कुणाल राऊत हे दोघे विभागीय आयुक्तांना त्यांच्या कार्यालयात जावून चोळी व बांगड्या देणार असल्याच्या माहितीवरून पोलीस निरीक्षक उदार यांच्या आदेशावरून पोलीस कॉन्स्टेबल शिरीष गोविंदराव भालेराव यांनी त्यांची भेट घेतली. तेव्हा यांच्यासोबत उद्धटपणे वर्तन करून धक्काबुक्की केली व जमिनीवर पाडून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यामुळे भालेराव यांच्या पायाला मार लागला. वैद्यकीय तपासणीनंतर भालेराव यांनी आरोपींविरुद्ध फिर्याद दाखल केली.
खटल्याची सुनावणी व शिक्षाअभियोग पक्षातर्फे बी. एन. आढावे यांनी साक्षीदारांचे जबाब नोंदविले. सुनावणीअंती आरोप सिद्ध झाल्यामुळे न्यायालयाने वरील दोघा आरोपींना शासकीय कामकाजात अडथळा निर्माण केल्याच्या आरोपाखाली भादंवि कलम ३५४ खाली प्रत्येकी एक वर्ष सश्रम कारावास आणि प्रत्येकी ५ हजार रुपये दंड आणि लोकसेवकाला मारहाण केल्याच्या आरोपाखाली भादंवि कलम ३३२ खाली प्रत्येकी ६ महिने सश्रम कारावास आणि प्रत्येकी ३ हजार रुपये दंड ठोठावला. आरोपी क्रं. १ व २ यांनी सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याच्या आरोपाखाली भादंवि कलम ३५४ खाली प्रत्येकी एक वर्ष सश्रम कारावास आणि प्रत्येकी ५ हजार रुपये दंड ठोठावला आणि कलम ३३२ खाली सहा महिने सक्तमजुरी आणि प्रत्येकी तीन हजार रुपये दंडाची शिक्षा