लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : पोलीस ठाण्याची पायरी चढण्याचे धाडस अनेकजण आजही करीत नाहीत; मात्र अज्ञात समाजकंटकाने शनिवारी रात्री समर्थनगरातील पोलीस नियंत्रण कक्षासमोरच्या वीर सावरकरांच्या पुतळ्याची विटंबना करीत थेट पोलीस यंत्रणेलाच आव्हान दिले.पोलीस आयुक्तालयाच्या इमारतीचे बांधकाम सुरू असल्याने सध्या पोलीस आयुक्तालयातील नियंत्रण कक्ष, आर्थिक गुन्हे शाखा, विशेष शाखा, दहशतवाद विरोधी सेल, सायबर क्राईम सेल आणि महिला तक्रार निवारण कें द्र आदी कार्यालये वीर सावरकर चौकातील एका इमारतीत स्थलांतरित झाली आहेत.या नियंत्रण कक्षातून शहरातील पोलीस ठाणी, गस्तीवरील पोलीस, वाहने, अधिकारी, कर्मचारी यांच्यावर नियंत्रण राखून कायदा व सुव्यवस्था राखली जाते. चार महिन्यांपासून समर्थनगर चौकात रात्रंदिवस वरिष्ठ पोलीस अधिकारी, कर्मचारी, बंदोबस्तासाठी बाहेरून बोलावलेले एस.आर.पी.चे जवान, होमगार्ड बसलेले असतात.पोलिसांची वाहने वीर सावरकर पुतळ्यासमोर आणि शेजारी उभी आहेत. पुतळ्याच्या ओट्यावर पोलीस कर्मचारी गप्पा मारताना दिसतात. एवढेच नव्हे, तर पुतळ्यापासून अवघ्या काही मीटरवर पोलिसांची मोटार वाहन शाखा आणि क्रांतीचौक ठाणे आहे. असे असताना समाजकंटकाने सावरकरांच्या पुतळ्याची विटंबना करून थेट पोलीस यंत्रणेला आव्हान दिले. क्रांतीचौक पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला.आता पुतळा दत्तक योजनाशहरातील विविध चौकात महापुरुषांचे पुतळे आहेत. सावरकर यांच्या पुतळ्याची विटंबना झाल्यानंतर पोलिसांनी सर्व पुतळ्यांचे संरक्षण करण्यासाठी तातडीने पुतळा दत्तक योजना सुरू केली, अशी माहिती पोलीस उपायुक्त विनायक ढाकणे यांनी पत्रकारांना दिली.उपायुक्त ढाकणे म्हणाले की, शहरातील प्रत्येक पोलीस ठाण्याच्या हद्दीत छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह अन्य विविध महापुरुषांचे पुतळे आहेत. पुतळा विटंबनेच्या घटना टाळण्यासाठी प्रत्येक ठाण्यात पुतळा दत्तक योजना राबविण्यात येणार आहे. ही योजना आजपासून अमलात येईल. दिवसा दोन आणि रात्री दोन याप्रमाणे चार हवालदार पुतळ्यांचे संरक्षणकरतील.समर्थनगरातील सीसीटीव्ही कॅमेरे बंदवीर सावरकर चौकात पोलिसांनी सेफ सिटी प्रकल्पांतर्गत बसविलेले सीसीटीव्ही कॅमेरे शुक्रवारपासून बंद पडले आहेत. यामुळे समाजकंटकांचे फावले. या कॅमेºयांच्या दुरुस्तीचे काम तातडीने हाती घेण्यात आल्याची माहिती ढाकणे यांनी दिली.
औरंगाबाद येथील पोलीस नियंत्रण कक्षच बेसावध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2018 11:59 PM
पोलीस ठाण्याची पायरी चढण्याचे धाडस अनेकजण आजही करीत नाहीत; मात्र अज्ञात समाजकंटकाने शनिवारी रात्री समर्थनगरातील पोलीस नियंत्रण कक्षासमोरच्या वीर सावरकरांच्या पुतळ्याची विटंबना करीत थेट पोलीस यंत्रणेलाच आव्हान दिले.
ठळक मुद्देदिव्याखाली अंधार : नियंत्रण कक्षापासून शंभर फुटांच्या अंतरावरील पुतळ््याची विटंबना