औरंगाबाद: आयसीस या आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटनेशी संपर्कात असल्याच्या संशयावरून दहशतवाद विरोधी पथकाने औरंगाबाद आणि ठाण्यातील मुंब्रा येथून अटक केलेल्या ९ पैकी ८ संशयितांना औरंगाबादेतील विशेष न्यायालयाने १४ दिवस पोलीस कोठडी सुनावली. एक जण अल्पवयीन असल्याने त्याला बालसुधारगृहात ठेवण्यात आले.
आरोपींकडून रासायनिक शस्त्रसाठा जप्त करण्यात आल्याचे समोर आले. मोहसीन सिराजउद्दीन खान (वय ३२,रा. मुंब्रा, ह.मु. अहबाब कॉलनी, औरंगाबाद), मजहर अब्दुल रशीद शेख (वय २१,रा. अलमास कॉलनी, मुंब्रा), मोहम्मद तकी उर्फ अबु खालीद सिराजउद्दीन खान (वय २०,रा. मुंब्रा,ह.मु. राहत कॉलनी, औरंगाबाद), मोहम्मद मुशाहिद उल इस्लाम (वय २३,रा, कैसर कॉलनी), मोहम्मद सर्फराज उर्फ अबू हमजा अब्दुल हक उस्मानी (वय २५,रा. राहत कॉलनी, औरंगाबाद), जमान नवाब खुटेपाड(वय ३२,रा. अलमास कॉलनी, मुंब्रा), सलमान सिराजउद्दीन खान (वय २८,रा, अलमास कॉलनी) आणि फहाद सिराजउद्दीन खान (वय २८,रा. अलमास कॉलनी)अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. एटीएसने अन्य एका १७ वर्षीय तरूणाला(विधीसंघर्षग्रस्त बालक)ताब्यात घेतले असून त्याला बालसुधारगृहात ठेवण्यात आले.