ब्ाीड : पोलीस कर्मचाऱ्यांसाठी सतत नाविन्यपूर्ण उपक्रम राबविणारे अधीक्षक अनिल पारसकर यांच्या संकल्पनेतून रविवारी पोलीस पाल्यांसाठी स्पर्धा परीक्षा घेण्यात आल्या. पहिल्यांदाच राबविलेल्या या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळाला. सहाशेवर विद्यार्थी परीक्षेला बसले होते.पोलीस कर्मचारी सतत आपल्या कामात व्यस्त असतात. आपल्या ‘बिझी शेड्यूल’मुळे त्यांना पाल्यांच्या शिक्षणाकडे लक्ष देणे शक्य होत नाही. पोलिसांची मुले अभ्यासात कुठेही मागे राहू नयेत यासाठी पोलीस कल्याण निधीतून कर्मचाऱ्यांच्या पाल्यांसाठी स्पर्धा परीक्षा घेण्याचा नवा पायंडा अधीक्षक पारसकर यांनी सुरु केला आहे. रविवारी दोन टप्प्यांत पार पडलेल्या या परीक्षेला सहाशेहून अधिक विद्यार्थी उपस्थित होते. पाचवी ते सातवी व आठवी ते दहावी इयत्तेतील विद्यार्थ्यांसाठी या परीक्षा जिल्ह्यतील सर्वच ठाण्यांतर्गत घेण्यात आल्या. बीडमध्ये पोलीस मुख्यालय मैदानावरील प्रेक्षक गॅलरीत ८० विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली. यावेळी शहर ठाण्याचे निरीक्षक एस. बी. पौळ, सहायक निरीक्षक मारुती शेळके, फौजदार बी. डी. सोनार आदी निगराणी ठेवून होते. सामान्य ज्ञानावर आधारित या परीक्षेत विद्यार्थ्यांना शंभर गुण दिले होते. विद्यार्थ्यांमध्ये या परीक्षेची कमालीची उत्सुकता होती. खेळण्यात व मौजमजा करण्यात वाया जाणारी रविवारची सुटी या विद्यार्थ्यांचे कसब पणाला लावणारी ठरली आाहे. रविवारी रात्रीच उत्तरपत्रिका तपासून सोमवारी निकाल जाहीर केला जाणार आहे. रोख रक्कम व प्रमाणपत्रस्पर्धा परीक्षेत यशस्वी ठरणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलीस प्रशासनाच्या वतीने रोख रक्कम व प्रमाणपत्र पारितोषिक म्हणून दिले जाणार आहे. यानिमित्ताने विद्यार्थ्यांना आपली बौद्धिक क्षमतेचा अंदाज येणार असून त्यांना प्रोत्साहनही मिळेल. (प्रतिनिधी)
पोलिसांच्या पाल्यांचे कसब पणाला
By admin | Published: December 25, 2016 11:49 PM