--------------------
शस्त्रसाठा करणाऱ्याला पोलीस कोठडी
औरंगाबाद : गरमपाणी परिसरात गुन्हे शाखेने छापा मारून ६ तलवारींसह एक गुप्ती व कुकरी असा सुमारे ६ हजार ५०० रुपयांचा शस्त्रसाठा जप्त केल्याच्या गुन्ह्यात शेख जाकेर शेख यते समोद्दीन याला ९ जुलैपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश मुख्य न्यायदंडाधिकारी पी.पी. मुळे यांनी बुधवारी दिले. सहायक सरकारी वकील मनीषा गंडले यांनी सरकारतर्फे काम पाहिले.
-------------------------------------------------
रेल्वेत प्रवाशांना लुटमार, आरोपीला कोठडी
औरंगाबाद : रेल्वेत प्रवाशांना चाकूने मारहाण करून लुटमार केल्याच्या गुन्ह्यात शुभम ऊर्फ शिवा जालिंदर दवणे याला ८ जुलैपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी पी. एच. जोशी यांनी बुधवारी दिले. सहायक सरकारी वकील ए.व्ही. घुगे यांनी सरकारतर्फे काम पाहिले.
---------------------
घाटीत चोरी करणाऱ्याला पोलीस कोठडी
औरंगाबाद : घाटीच्या बॉईज हॉस्टेलमध्ये चोरी करणारा शाम विठ्ठल जाधव याला ९ जुलैपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी बी. डी. तारे यांनी बुधवारी दिले. सहायक सरकारी वकील एन. ए. ताडेवाड यांनी सरकारतर्फे काम पाहिले.
-----------------------------------------------------
मारहाणीच्या गुन्ह्यात जामीन नाकारला
औरंगाबाद : जागेच्या वादावरून भावकीतील कुटुंबाला कोयता, लोखंडी रॉड व लाकडी दांड्याने जबर मारहाण करून गंभीर जखमी केल्याच्या गुन्ह्यात एसआरपीफचा शिपाई सचिन ऊर्फ किशोर रामचंद्र सोमाते याचा अटकपूर्व जामीन अर्ज सत्र न्यायाधीश व्ही.पी. कदम यांनी नामंजूर केला. सरकारतर्फे सहायक लोकाभियोक्ता आर.सी. कुलकर्णी यांनी काम पाहिले.
-----------------------------------------------------
जीवे मारण्याचा प्रयत्न, जामीन नाकारला
औरंगाबाद : घरात शिरून महिलेला शिवीगाळ व मारहाण करून, तिला विषारी औषध पाजून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याच्या गुन्ह्यात पाच जणांनी सादर केलेला अटकपूर्व जामीन अर्ज सत्र न्यायाधीश एस.एम. अगरकर यांनी नामंजूर केला.
प्रभू नारायण पवार, छन्नू नारायण पवार, गोरख प्रभू पवार, मच्छींद्र प्रभू पवार आणि गणेश प्रभू पवार अशी त्यांची नावे आहेत. सरकारतर्फे सहायक लोकाभियोक्ता उल्हास पवार यांनी काम पाहिले.
----------------------
२६ लाखांची फसवणूक, महिला तुरुंगात
औरंगाबाद : निशांत मल्टिस्टेट को- ऑप क्रेडिट सोसायटी लि. अकोलाच्या रेल्वे स्टेशन रोड औरंगाबाद शाखेत बनावट सोने ठेवून २६ लाख २३ हजार रुपयाची फसवणूक करणारी महिला लिलाबाई राजू म्हस्के हिची न्यायालयीन कोठडीत हर्सुल तुरुंगात रवानगी करण्याचे आदेश मुख्य न्यायदंडाधिकारी पी.पी. मुळे यांनी बुधवारी दिले.
-------------------
१९ लाखांची फसवणूक करणारा तुरुंगात
औरंगाबाद : ३०० टन भंगार खरेदी करण्याचे आमिष दाखवून, शहरातील भंगार व्यापाऱ्याची १९ लाख ४१ हजार ९५२ रुपयांची फसवणूक करणारा चेतन व्यंकटेश नायडू याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी ए.एस. वानखेडे यांनी बुधवारी दिले.
----------------------------------------------