लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : वेदांतनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत राजरोसपणे जुगार अड्डा सुरू असतानाही त्याकडे दुर्लक्ष करणे ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दादासाहेब सिनगारे यांच्या चांगलेच अंगलट आले. याप्रकरणी गंभीर दखल घेऊन पोलीस आयुक्त यशस्वी यादव यांनी पोलीस निरीक्षक सिनगारे यांच्यावर निष्काळजीपणाचा ठपका ठेवत सोमवारी रात्री त्यांना तडकाफडकी निलंबित केले.रेल्वेस्टेशन रोडवरील एका इमारतीत सुरू असलेल्या जुगार अड्ड्याचा आर्थिक गुन्हे शाखेने रविवारी रात्री धाड मारून पर्दाफाश केला. या अड्ड्यावर जुगार खेळताना ५० जुगा-यांना पोलिसांनी अटक करून त्यांच्याकडून रोख ४ लाख १३ हजार रुपयांसह एकूण १४ लाख ३५ हजारांचा मुद्देमाल जप्त केला होता. औरंगाबाद शहर आयुक्तपदाचा चार्ज घेतल्यानंतर आयुक्त यशस्वी यादव यांनी अवैध धंदे करणा-यांना आणि त्यांना पाठीशी घालणा-यांवर कडक कारवाई करण्याचा इशारा दिला होता.आयुक्तांच्या आदेशानंतरही शहरातील विविध भागांत खुलेआम जुगार अड्डे सुरू झाले आहेत. विशेष म्हणजे संबंधित पोलीस ठाण्याच्या प्रमुखाला याबाबत माहिती मिळत असते. ठाणे प्रमुखांनी माहिती मिळताच संबंधितांवर कारवाई करणे अपेक्षित असते. एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तीसगाव येथील एका क्लबमध्ये चालणाºया जुगार अड्ड्यावर २२ सप्टेंबर रोजी पोलिसांनी छापा मारला. तेव्हा तेथे १२ जुगाºयांना पकडण्यात आले. त्यांच्याकडून रोख रकमेसह १५ लाखांचा ऐवज जप्त केला होता. या कारवाईनंतरही शहरातील जुगार अड्डा चालविणाºयांवर कोणताही परिणाम झाला नाही. रेल्वेस्टेशन येथील एक ा माजी नगरसेवकाने इमारतीत राजरोसपणे जुगार अड्डा सुरू करण्यात आला होता.पथनाक्यावर वसुली करणारे पोलीस निलंबितलोकमत न्यूज नेटवर्कवाळूज महानगर : औरंगाबाद-नगर महामार्गावरील शिवराई पथकर नाक्यावर वाळूची चोरटी वाहतूक करणारे, तसेच परराज्यातील वाहनधारकांकडून जबरदस्तीने ‘एंट्री’ वसूल करणा-या वाळूज पोलीस ठाण्याच्या दोन पोलीस कर्मचा-यांना पोलीस उपायुक्त डॉ. दीपाली धाटे-घाडगे यांनी तडका-फडकी निलंबित केले. या कारवाईमुळे वाळूज महानगर परिसरात खळबळ उडाली. यात आणखी काही पोलीस कर्मचा-यांचा सहभाग असल्याची चर्चा सुरू आहे.शिवराई पथकर नाक्यावर वाळूज पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक सुरेश इंगळे व एस.एम. साळवे हे दोघे या मार्गावरून वाळूची अवैध वाहतूक करणा-या हायवा ट्रक, टेम्पो, ट्रॅक्टर, तसेच परराज्यातून येणाºया वाहनधारकांना नाक्यावर अडवून नियमबाह्यपणे पैसे घेत होते. गेल्या अनेक दिवसांपासून हा प्रकार सुरू असल्यामुळे गुप्त बातमीदाराने या प्रकरणी वरिष्ठ पोलीस अधिका-यांना या प्रकाराची माहिती दिली होती. या माहितीनंतर पोलीस आयुक्त यशस्वी यादव यांनी गंभीर दखल घेत वाहतूक शाखेचे निरीक्षक एल. ए. शिनगारे यांना सत्यता पडताळून पाहण्याचे आदेश दिले.हे दोन्ही पोलीस कर्मचारी वाहनधारकांंना कारवाईची भीती दाखवीत त्यांच्याकडून एंट्री वसूल करीत असल्याचे चौकशीत स्पष्ट झाले होते. या पथकर नाक्यावरील सीसीटीव्ही कॅमे-यात या पोलीस कर्मचा-यांच्या ‘करामती’ कैद झाल्या होत्या.
जुगार अड्ड्याप्रकरणी पोलीस निरीक्षक निलंबित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2017 1:03 AM