शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: जातीय दुभंगाला सोयाबीनचा तडक! मराठवाड्यातील लढतींचा लक्ष्यवेध
2
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
3
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२४, आर्थिक लाभाचा़ दिवस, घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील
4
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
5
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
6
Savner Assembly Election 2024: सख्ख्या भावांच्या लढतीत वहिनी मारणार का बाजी?
7
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
8
मणिूपरच्या जिरिबाममध्ये तिघांचे मृतदेह सापडल्याने प्रचंड तणाव; मंत्र्यांच्या घरासमोर निदर्शने
9
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
10
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
11
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
12
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
13
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
14
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
15
बनावट शस्त्र, परवाना रॅकेटचा अहिल्यानगर पोलिसांकडून पर्दाफाश; जम्मू काश्मिरमध्ये नऊ जणांना अटक
16
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
17
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
18
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
19
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
20
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात

लाच प्रकरणात अटक असलेल्या पोलीस निरीक्षक वसीम हाश्मी यांना आयुक्तांनी केले निलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2017 7:33 PM

गुन्हा दाखल न करण्यासाठी तक्रारदाराकडून ३५ हजार रुपयांची लाच घेताना एसीबीने रंगेहात पकडलेल्या बेगमपुरा ठाण्याचे निरीक्षक वसीम हाश्मी यांना पोलीस आयुक्त यशस्वी यादव यांनी शुक्रवारी रात्री उशिरा तडकाफडकी निलंबित केले.

ठळक मुद्देलाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून त्यांच्यावरील कारवाईविषयी अहवाल प्राप्त होताच पोलीस आयुक्तांनी कारवाई केली.

औरंगाबाद, दि. १४ : गुन्हा दाखल न करण्यासाठी तक्रारदाराकडून ३५ हजार रुपयांची लाच घेताना एसीबीने रंगेहात पकडलेल्या बेगमपुरा ठाण्याचे निरीक्षक वसीम हाश्मी यांना पोलीस आयुक्त यशस्वी यादव यांनी शुक्रवारी रात्री उशिरा तडकाफडकी निलंबित केले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून त्यांच्यावरील कारवाईविषयी अहवाल प्राप्त होताच पोलीस आयुक्तांनी कारवाई केली.

पोलीस निरीक्षक वसीम हाश्मी यांना ३५ हजार रुपये लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिका-यांनी सापळा रचून १२ आॅक्टोबर रोजी रात्री बेगमपुरा ठाण्यातच पकडले. शुक्रवारी  सायंकाळी न्यायालयाने त्यांना १६ आॅक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी ठोठावली आहे. या कारवाईची माहिती एसीबीच्या औरंगाबाद परिक्षेत्राचे अधीक्षक श्रीकांत परोपकारी यांनी दुस-याच दिवशी दुपारी पोलीस आयुक्तांना दिली होती. शिवाय सायंकाळी एसीबी कार्यालयाकडून सविस्तर अहवाल पोलीस आयुक्तालयाला पाठविण्यात आला.

हा अहवाल प्राप्त होताच पोलीस आयुक्त यशस्वी यादव यांनी पोलीस निरीक्षक हाश्मी यांच्यावर रात्री उशिरा निलंबनाचे आदेश जारी केले. पोलीस आयुक्तांनी याबाबत माहिती दिली. ते म्हणाले की, हाश्मी यांची खातेनिहाय चौकशी केली जाणार आहे. शिवाय बेगमपुरा ठाण्याचा चार्ज पोलीस उपनिरीक्षक राहुल रोडे यांच्याकडे तात्पुरत्या स्वरूपात सोपविण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.