लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्तीवर असताना ट्रॅक्टर, ट्रकसह अन्य वाहने अडवून त्यांना त्रास देणा-या एका पोलीस हेड कॉन्स्टेबलचे स्टिंग आॅपरेशन चक्क वाहतूक शाखेचे सहायक पोलीस आयुक्त सी. डी. शेवगण यांनी केले. त्यांनी केलेल्या स्टिंग आॅपरेशनचा अहवाल पोलीस आयुक्तांना प्राप्त होताच त्यांनी त्या पोलीस हेड कॉन्स्टेबल करून अहवाल सादर केला. त्याआधारे अरुण फोलानेची चौकशी करून त्याला तडकाफडकी निलंबित केले. या कारवाईने पोलीस दलात खळबळ उडाली.याविषयी सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, वाळूज एमआयडीसी एरियात वाळूची वाहतूक करणाºया ट्रॅक्टरसह अन्य वाहनांना पोलीस अडवितात आणि त्यांच्याकडून वसुली करतात, अशी तक्रार वाहतूक विभागाचे सहायक पोलीस आयुक्त सी. डी. शेवगण यांना प्राप्त झाली होती. याबाबत सहायक आयुक्तांनी वाळूज वाहतूक शाखेचे निरीक्षक मनोज पगारे यांच्याकडे विचारणा केली असता रात्री ९ वाजेनंतर वाहतूक पोलिसांची ड्यूटी समाप्त होते.यानंतर वाहतूक पोलीस रस्त्यावर नसतात. यामुळे वाहतूक पोलीस यात नसल्याचे त्यांनी सांगितल्याचा निर्वाळा त्यांनी दिला होता. वाहतूक पोलीस नाही, तर मग वाहनचालकाची अडवणूक करणारे कोण आहेत, याबाबतची शहानिशा करण्यासाठी पोलिसांनीच या प्रकरणाचे स्टिंग आॅपरेशन केले. या स्टिंग आॅपरेशनमध्ये एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात कार्यरत असलेला एक वाहनचालक एका ट्रॅक्टरचालकास अडवून त्याच्याशी बोलत असल्याचे छायाचित्रे एसीपी शेवगण यांना प्राप्त झाली.
पोलीस अधिका-यानेच केले पोलिसांचे स्टिंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2017 12:49 AM