बापू सोळुंकेऔरंगाबाद : शहरातील गुन्हेगारी रोखण्यासाठी आणि झालेल्या गुन्ह्यांची तत्परतेने उकल व्हावी, यासाठी शहर गुन्हे शाखेतील अधिकारी, कर्मचाºयांसाठी केआरए (की रिझल्ट एरिया) लागू करण्यात आला आहे. एखाद्या कॉर्पोरेट कंपनीतील कर्मचाºयाप्रमाणे आता गुन्हे शाखेतील प्रत्येक अधिकारी आणि कर्मचाºयांना त्यांनी केलेल्या स्वतंत्र कामगिरीचा अहवाल पथकप्रमुखांच्या स्वाक्षरीने वरिष्ठ अधिकाºयांना सादर करणे बंधनकारक करण्यात आले.पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील सतरा पोलीस ठाण्यांतर्गत घडणाºया क ोणत्याही अवैध धंद्यांविरोधात कारवाईचे अधिकार गुन्हे शाखेला असतात. पोलीस आयुक्तांची शाखा म्हणून गुन्हे शाखेकडे पाहिले जाते. पोलीस आयुक्त, उपायुक्त, सहायक आयुक्तांचे थेट नियंत्रण या शाखेवर असते. यामुळेच पोलीस निरीक्षकपदाला महत्त्व आणि ग्लॅमर असते. या शाखेत सध्या पोलीस निरीक्षक मधुकर सावंत यांच्यासह दहा पोलीस अधिकारी आणि ९७ पोलीस कर्मचारी कार्यरत आहेत. गुन्हे शाखेत दहा पथके कार्यरत असून, प्र्रत्येक पथकप्रमुख हा पोलीस उपनिरीक्षक, सहायक निरीक्षक दर्जाचा अधिकारी आहे. गुन्हे शाखेत वर्र्णी लागावी, यासाठी अधिकारी- कर्मचारी इच्छुक असतात. मात्र वरिष्ठांच्या आदेशाने पोलीस निरीक्षक मधुकर सावंत यांनी गुन्हे शाखेत काम करणाºया प्रत्येक अधिकारी, कर्मचाºयांसाठी कॉर्पोरेट कंपनीप्रमाणे केआरए लागू केला. तेव्हापासून मात्र या गुन्हे शाखेचा कर्मचारी म्हणून मिरवणाºया अधिकारी- कर्मचाºयांचे धाबे दणाणले आहे. सूत्रांनी सांगितले की, शहर मान उंचावेल, अशा प्रकारची कामगिरी या शाखेकडून अपेक्षित असल्याचे वरिष्ठ अधिकाºयांनी यापूर्वीच स्पष्ट केले होते. मध्यंतरीच्या काळात गुन्हे शाखेकडून विशेष अशी कामगिरी झाली नव्हती. मात्र गत महिन्यात पोलिसांवर हल्ला करून इम्रान मेहदीला सोडून नेण्याचा पोलिसांनी उधळलेला कट आणि राजनगर, छावणी येथील खुनाचा उलगडा करण्यात आलेले यश गुन्हे शाखेसाठी दिलासादायक ठरले. शहरातील मोठ्या घरफोड्या, मंगळसूत्र चोरी आणि वाहन चोरीच्या घटना रोखण्यात मात्र अद्यापही गुन्हे शाखा यशस्वी झालेली नाही. शहरात घडणाºया गुन्ह्यांची तातडीने उकल व्हावी आणि गुन्ह्यांना प्रतिबंध करण्यासाठी गुन्हे शाखेकडून रोज कारवाई व्हावी, यासाठी पोलीस निरीक्षक मधुकर सावंत यांनी पथकप्रमुख आणि पथकातील प्रत्येक कर्मचाºयाच्या स्वतंत्र कारवाईचा अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले.पथकाच्या कामगिरीवर लक्षगुन्हे शाखेची विविध पथके गुन्हेगारांवर कारवाई करतात ही कामगिरी पथकाची त्या पथकातील एखाद्या कर्मचाºयाची असू शकते. प्रत्येक कर्मचाºयांनी स्वतंत्र माहिती आणून कारवाई करणे आवश्यक आहे. ही बाब लक्षात घेऊन आता प्रत्येक कर्मचाºयांना कॉर्पोरेट कंपनीतील कर्मचाºयांप्रमाणे केआरए लागू करण्यात आला. अधिकाºयांची नियमित बैठक घेतली जाते.मधुकर सावंत, पोलीस निरीक्षक, गुन्हे शाखा.
पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी आता ‘केआरए’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2018 11:27 PM
शहरातील गुन्हेगारी रोखण्यासाठी आणि झालेल्या गुन्ह्यांची तत्परतेने उकल व्हावी, यासाठी शहर गुन्हे शाखेतील अधिकारी, कर्मचाºयांसाठी केआरए (की रिझल्ट एरिया) लागू करण्यात आला आहे. एखाद्या कॉर्पोरेट कंपनीतील कर्मचाºयाप्रमाणे आता गुन्हे शाखेतील प्रत्येक अधिकारी आणि कर्मचाºयांना त्यांनी केलेल्या स्वतंत्र कामगिरीचा अहवाल पथकप्रमुखांच्या स्वाक्षरीने वरिष्ठ अधिकाºयांना सादर करणे बंधनकारक करण्यात आले.
ठळक मुद्दे गुन्हे शाखेचा निर्णय : पोलिसांत कॉर्पोरेट कल्चर; गुन्हेगारी रोखण्यासाठी उपाययोजना करण्याचा प्रयत्न