खुलताबाद : तालुक्यातील येसगाव येथील पोलीस पाटील शंकर काळे यांनी तंटामुक्त गाव समितीच्या रकमेचा गैरव्यवहार केल्याच्या लेखापरिक्षण अहवाल व तहसीलदार खुलताबाद यांच्या अहवालावरून पोलीस पाटील काळे यांना उपविभागीय अधिकारी जनार्दन विधाते यांनी निलंबित केले आहे. त्यामुळे येसगावात एकच खळबळ उडाली आहे.
उपविभागीय अधिकारी जनार्दन विधाते यांनी दिलेल्या आदेशात म्हटले आहे की, तहसिलदार खुलताबाद यांनी पोलीस पाटील शंकर शेनफडू काळे यांचे विरुध्द असलेल्या दोषारोप ज्यात गावामध्ये शांतता व सुव्यवस्था राखण्याऐवजी गावात वाद निर्माण करुन आधिक मोबदला मिळावा याबाबत कृत्य केलेले आहे . तसेच पोलीस पाटील या पदावर कार्यरत असतांना त्यांनी त्यांच्या सेवामध्ये जाणिवपुर्वक व असहेतुने गैरवर्तन केलेले आहे तसेच त्यांच्या पोलीस पाटील पदाचे कर्तव्याकडे दुर्लक्ष केले असल्याचे नमुद केले आहे. पोलीस पाटील शंकर शेनफडू काळे यांनी सन २०१४-१५ या वर्षी तंटामुक्त समितीस शासनाकडुन प्राप्त झालेल्या निधीचा गैरवापर करुन रकमेचा अपहार केलेले असल्याबाबत तक्रारीवर सहाय्यक लेखापरिक्षा अधिकारी , स्थानिक निधी लेखा परिक्षा , औरंगाबाद यांचे दिनांक ०२/०७/२०२१ च्या पत्रानुसार समितीने पुरस्काराच्या रकमेतुन खर्च करतांना उपरोक्त शासन निर्णयाप्रमाणे ग्रामसभेची मंजुरी घेतल्याचे कागदपत्रे / ठराव सादर केलेले नाही . तसेच ग्रामसभेने पुरस्कार रकमेच्या विनियोगाबाबत काय निर्णय दिला याबावची कागदपत्रे लेखापरिक्षणास उपलब्ध केलेली नसल्याने केलेला खर्च मंजुरीच्या अधिन राहुन केल्याचे प्रथम दर्शनी दिसुन येत नाही त्यामुळे असे निदर्शनास येते की, पोलिस पाटील शंकर शेनफडू काळे यांनी परिशिष्ठ प्रपत्र १ ते ४ बाबत समर्थनिय खुलासा सादर केलेला नाही . तसेच पोलीस पाटील पदावर कार्यरत असतांना त्यांनी त्यांच्या सेवेमध्ये जाणिवपुर्वक व असद्हेतुन गैरवर्तन केले तसेच पोलीस पाटील पदाच्या कर्तव्यात कसुर करून , ग्रामपोलीस अधिनियम १ ९ ६७ च्या कलम ६ चा भंग झालेला आहे. त्यामुळे उपविभागीय दंडाधिकारी कन्नड यांनी पोलीस पाटील शंकर शेनफडू काळे यांना पोलीस पाटील पदावरून निलंबीत केले आहे.