खुलताबाद : बनावट गुटखा बनविण्याची तयारी सुरु असताना तालुक्यातील खिर्डी येथे पोलिसांनी छापा टाकून ३ लाख १८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी दोघा जणांवर खुलताबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अन्न सुरक्षा अधिकारी तसेच खुलताबाद पोलिसांनी ही संयुक्त कारवाई केली.
तालुक्यातील खिर्डी या ठिकाणी असलेल्या कोहिनूर मंगल कार्यालयात अवैधरित्या प्रतिबंधित पदार्थ विक्रीकरिता साठा करुन ठेवल्याची गुप्त माहिती खुलताबादचे पोनि. सीताराम मेहेत्रे यांना मिळाली होती. त्यांनी ही माहिती अन्न सुरक्षा अधिकारी सुलक्षणा जाधव, औरंगाबाद यांना दिली. त्यानुसार शुक्रवारी अन्न सुरक्षा अधिकारी व पोनि. सीताराम मेहेत्रे, पोउनि. दिनेश जाधव, पोना. यतीन कुलकर्णी, सुहास डबीर व महसूल विभागाच्या पथकाने कोहिनूर मंगल कार्यालयात छापा टाकला. यामध्ये एका खोलीत दडवून ठेवलेले प्रतिबंधित पदार्थ मोठ्या प्रमाणात आढळून आले. यात दहा किलोग्राम वजनाचा सुगंधित तंबाखू, पांढऱ्या रंगाच्या बिना लेबलच्या प्लास्टिकच्या पिशव्या ज्यामध्ये साडेचार किलो ग्रॅम वजनाचा सुगंधित तंबाखू, सिल्वर रंगाच्या विना लेबलच्या प्लास्टिक पिशव्या ज्यात ५०० ग्रॅम वजनाचा सुगंधित तंबाखू, ३०० ग्रॅम केशर, ९०० ग्रॅम सिल्वर रंगाचा भुकटा, सुगंधित तंबाखू पॅकिंग करता वापरण्यात येणारे कागदी स्टीकर, प्लास्टिक पाऊच १६ किलो, पांढऱ्या रंगाचा सुगंधित तंबाखू पॅकिंगची मशीन, एक वजन काटा असा एकूण ३ लाख १८ हजार ९५० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
याप्रकरणी अन्न सुरक्षा अधिकारी सुलक्षणा जाधववर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार मुस्ताक अली सय्यद (खिर्डी) व मोहम्मद फरीद मोहम्मद (औरंगाबाद) यांच्याविरुद्ध खुलताबाद पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोनि. सीताराम मेहेत्रे करीत आहेत.
फोटो कॅप्शन : खिर्डी येथे कोहिनूर मंगल कार्यालयात छापा मारून कारवाई करतांना पोलीस, महसूल व अन्नसुरक्षा विभागाचे पथक.
230421\sunil gangadhar ghodke_img-20210423-wa0047_1.jpg
खिर्डी येथे कोहिनूर मंगल कार्यालयात छापा मारून कारवाई करतांना पोलीस ,महसुल व अन्नसुरक्षा विभागाचे पथक.