लोकमत न्यूज नेटवर्कशेंद्रा : औरंगाबाद तालुक्यातील वरूड काजी येथे अनेक घरांत अवैधरीत्या सुरू असलेल्या गोवंश कत्तलखान्यांवर पोलिसांनी छापा मारून गुन्हा दाखल केला आहे. चिकलठाणा पोलिसांनी गुरुवारी सकाळी ही कारवाई केली. पोलिसांची चाहूल लागताच शंभरपेक्षा अधिक जनावरांना सोडून कत्तल करणारे पसार झाले.चिकलठाणा पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक सत्यजित ताईतवाले यांना खबऱ्याकडून मिळालेल्या माहितीवरून ते कर्मचाºयांसह वरूड काजी येथे धडकले व अवैध कत्तलखान्यांवर त्यांनी छापे टाकले. त्यावेळी विविध ठिकाणी जनावरांची अवैध कत्तल सुरू असल्याचे निदर्शनास आले. यावेळी पंचनामा करून नासेर मन्नू कुरेशी, राऊफ कुरेशी, फकीर महंमद कुरेशी व त्यांच्या साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला.यावेळी पशुवैद्यकीय अधिकारी बन्सोडे यांना सोबत घेऊन पोलिसांनी छापे मारले. बैलाचे मांस, कातडी, मुंडके, कत्तल करण्यासाठी वापरण्यात येणारे साहित्य व एक रिक्षा, असा ३ लाख ३६ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या घटनेत तीन मुख्य आरोपींसह त्यांच्या इतर साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला. घटनास्थळावरून पसार झालेल्या आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत. पुढील तपास सहायक फौजदार गोपाळ देशमुख करीत आहेत.ग्रामस्थांनी केले पोलिसांवर आरोपवरूड काजी येथे अवैध कत्तलखाने सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. येथील ग्रामस्थांनी ‘लोकमत’ला दिलेल्या माहितीनुसार वरूड येथे अवैध कत्तलखाने सुरू असल्याच्या तक्रारी ग्रामस्थांनी चिकलठाणा पोलीस ठाण्यात व अधीक्षक कार्यालयात वर्षभरापूर्वी केलेल्या आहेत. पोलिसांनी हे अवैध कत्तलखाने बंद करावेत. यामुळे गावातील वातावरण दूषित होत आहे. नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होत आहे. यामुळे अनेक वेळा गावात वादसुद्धा झालेला आहे. पोलिसांनी या घटनेकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप निवेदनाद्वारे कृष्णा दांडगे, शेखर दांडगे, विठ्ठल दांडगे, कैलास दांडगे, बालाजी दांडगे, योगेश दांडगे, भास्कर बारबैले, गजानन गव्हाणे, श्रीकृष्ण दांडगे, गोरख दांडगे आदी ग्रामस्थांनी केला आहे.
गोवंश कत्तलखान्यांवर पोलिसांचे छापे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2018 12:50 AM
औरंगाबाद तालुक्यातील वरूड काजी येथे अनेक घरांत अवैधरीत्या सुरू असलेल्या गोवंश कत्तलखान्यांवर पोलिसांनी छापा मारून गुन्हा दाखल केला आहे. चिकलठाणा पोलिसांनी गुरुवारी सकाळी ही कारवाई केली. पोलिसांची चाहूल लागताच शंभरपेक्षा अधिक जनावरांना सोडून कत्तल करणारे पसार झाले.
ठळक मुद्देवरूड काजीत कत्तल : आरोपी फरार; चिकलठाणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल; अनेक जनावरे ताब्यात