परभणी : दोन दिवसांपूर्वी शहरात २ कोटी रुपयांची फसवणूक केल्या प्रकरणी सात जणांविरूद्ध गुन्हा नोंद झाला आहे़ या प्रकरणात पोलिसांनी ४ आरोपींना ताब्यात घेतले आहे़ मात्र या प्रकरणाच्या तपासाविषयी माहिती देण्यास टाळाटाळ करीत गुप्तता पाळली आहे़ नासा या अंतराळ संस्थेत वापरली जाणारी वस्तू आपल्याकडे आहे़, असा बनाव करून २ कोटी १७ लाख रुपयांची फसवणूक केल्याच्या प्रकरणात नानलपेठ पोलिस ठाण्यात सात जणांविरूद्ध गुन्हा नोंद झाला आहे़ या प्रकरणात हम्मू चाऊस या आरोपीस पोलिसांनी अटक केली असून, त्यानंतर आणखी तीन आरोपींना अटक केली आहे़ या सर्व आरोपींना १९ मार्चपर्यंतची पोलिस कोठडी न्यायालयाने सुनावली आहे़ या प्रकरणात सायबर सेलच्या माध्यमातून तपास सुरू असल्याची माहिती मिळाली़ असे असले तरी आरोपींच्या शोधासाठी काय उपाययोजना केली जात आहे? तपासाची दिशा आणि पकडलेल्या आरोपींची नावे सांगताना पोलिसांकडून टाळाटाळ केली़
फसवणूक प्रकरणात पोलिसांची गुप्तता
By admin | Published: March 16, 2016 8:29 AM