लोकमत न्यूज नेटवर्कगेवराई : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील कर्ज प्रकरणात फसवणूक केल्याच्या आरोपाखाली माजी मंत्री शिवाजीराव पंडित, आ. अमरसिंह पंडित, चेअरमन जयसिंह पंडित यांच्यासह २८ जणांवर गुन्हा दाखल झाल्यानंतर राजकीय सुडापोटी गुन्हे दाखल केल्याचा आरोप करत सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्यांनी पालकमंत्री पंकजा मुंडे यांचे पुतळे जाळले आणि घोषणा देऊन संताप व्यक्त केला. गेवराईसह ग्रामीण भागात बंद पाळण्यात आला.राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी या प्रकरणाचा निषेध व्यक्त केला. ३०० ते ४०० तरुणांनी रॅली काढून संपूर्ण गेवराई शहरात फिरून दुकाने बंद केली. तालुक्यातील मादळमोही येथे खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष डिगांबर येवले, युवा नेते राजाभाऊ वारंगे, दत्ता हकदार दीपक वारंगे यांच्या नेतृत्वाखाली गावातून फेरी काढून दाखल गुन्ह्याचा निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी मन्सूरभाई, शिवाजीराव माखणे, शेख समशेर, भिमा भोपळे, सदाशिव वाघमारे, दिलीप राक्षे, नारायण गोडसे, अवदुत येवले, जगदीश मोटे, माऊली तळेकर, अयुब पठाण, बाबुराव येवले, सुरेश भोपळे, जालिंदर मोहिते, सुनिल पुरी, हनुमान गोडसे, अरुण वाघमारे, संभाजी हकदार, सादेक कुरेशी, बंडू दरेकर, बळीराम राक्षे, पिंटू तळेकर, शेख सिराज यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.उमापूरमध्ये माजी जि.प.सदस्य संग्राम आहेर, रावसाहेब देशमुख, बप्पासाहेब आहेर, कारखान्याचे माजी संचालक प्रेमचंद गायकवाड, चेअरमन तुळशीदास औटी, बाजार समितीचे संचालक बळीराम खरात, कमळाजी विर, बाबासाहेब टेकाळे, रवि आहेर, अजय आहेर, शेखर औटी, राहुल देशमुख, अमोल देशमुख, विष्णू दळवी आदींनी भाजप नेतृत्वाचा निषेध करण्यासाठी प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले. यावेळी शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.दरम्यान, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विजयसिंह पंडित यांनी दाखल झालेले गुन्हे राजकीय सुडापोटी असल्याचे सांगितले. सोमवारी गुन्हा दाखल झाल्यानंतर तालुक्यात ठिकठिकाणी तीव्र पडसाद उमटल्याने त्यांनी कार्यकर्त्यांना शांतता राखून कायदा व सुव्यवस्था कोठेही बिघडणार नाही याची दक्षता घेण्याचे आवाहन केले.
राजकीय सुडाचा आरोप; गेवराईमध्ये बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2017 11:01 PM