शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
2
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् मोठ्या तोंडाने सांगतात..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
3
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
4
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
5
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
6
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
7
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
8
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
9
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
10
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
11
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
12
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
13
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
14
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
15
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
16
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
17
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
18
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
19
ट्रम्प विजयाबरोबरच सोन्याचे 'अच्छे दिन' संपले, दिसून आली 3 वर्षातील सर्वात मोठी घसरण! आता खरेदी करायला हवं की नको?
20
'चूक झाली, यापुढे इकडे-तिकडे जाणार नाही', सीएम नितीश कुमारांचा पीएम मोदींना शब्द

लिंबोटीवरुन मन्याड खो-याचे राजकारण तापले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2017 12:42 AM

लोहा-कंधार तालुक्यात यंदा सरासरीच्या निम्माच पाऊस झाला़ त्यामुळे सलग चार वर्षे दुष्काळाचे चटके सहन करणाºया शेतकºयांचे तोंडचे पाणी पळाले आहे़ त्यात लिंबोटी प्रकल्प शंभर टक्के भरलेला आहे़ रबी हंगामही काही दिवसांवर येऊन ठेपला आहे़ त्यामुळे लिंबोटीच्या पाण्याचे सिंचनासाठी आवर्तन सोडण्यावरुन सध्या आ़ प्रताप पाटील चिखलीकर आणि माजी आ़शंकरअण्णा धोंडगे यांच्यात द्वंद पेटले आहे़ त्यामुळे मन्याड खोºयाचे राजकारण लिंबोटीच्या पाण्यावरुन चांगलेच तापले आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कलोहा/नांदेड:लोहा-कंधार तालुक्यात यंदा सरासरीच्या निम्माच पाऊस झाला़ त्यामुळे सलग चार वर्षे दुष्काळाचे चटके सहन करणाºया शेतकºयांचे तोंडचे पाणी पळाले आहे़ त्यात लिंबोटी प्रकल्प शंभर टक्के भरलेला आहे़ रबी हंगामही काही दिवसांवर येऊन ठेपला आहे़ त्यामुळे लिंबोटीच्या पाण्याचे सिंचनासाठी आवर्तन सोडण्यावरुन सध्या आ़ प्रताप पाटील चिखलीकर आणि माजी आ़शंकरअण्णा धोंडगे यांच्यात द्वंद पेटले आहे़ त्यामुळे मन्याड खोºयाचे राजकारण लिंबोटीच्या पाण्यावरुन चांगलेच तापले आहे़माजी आ़धोंडगे यांनी लिंबोटीचे पाणी सोडण्यासाठी लोहा येथे लाभक्षेत्रातील शेतकºयांची बैठक घेवून पाटबंधारे विभागाच्या अधीक्षक अभियंत्यांना निवेदन दिले होते़, परंतु त्यानंतरही पाटबंधारे विभागाकडून पाणी सोडण्याचे नियोजन करण्यात आले नाही़ त्यामुळे शुक्रवारी धोंडगे यांनी अधीक्षक अभियंत्याच्या कार्यालयासमोरच ठिय्या आंदोलन केले होते़ त्यानंतर शनिवारी लोहा येथे शेतकºयांची बैठकही त्यांनी घेतली़ त्यानंतर पत्रपरिषदेत शंकरअण्णा धोंडगे म्हणाले, यंदा पर्जन्यमान सरासरीपेक्षा कमी झाले़ त्यामुळे पिकांना उत्पादन मिळाले नाही़ पिकांची आणेवारी प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी प्रत्यक्ष शेतात जाऊन न काढता कागदोपत्री करतात. सरकारने पुरेशा कोळशाअभावी वीजनिर्मितीला बाधा येत असल्याचे सांगितले़ त्यानंतर थकबाकीचे कारण पुढे करीत कृषी पंपाची वीजजोडणी ऐन हंगामाच्या तोंडावर तोडली़ खरीप गेले, रबीही जाणार मग खाणार काय? अशा विवंचनेत शेतकरी सापडला आहे़ त्यामुळे येत्या १३ नोव्हेंबर रोजी लिंबोटी धरणावर गेट खाली करो आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा त्यांनी दिला़यावेळी दत्ता पाटील, संजय पाटील कºहाळे, बाबासाहेब देशमुख, प्रल्हाद फाजगे यांची उपस्थिती होती़तर याबाबत आ़ प्रताप पाटील चिखलीकर म्हणाले, आमदार या नात्याने ३० आॅक्टोबर रोजी जिल्हाधिकारी अरुण डोंगरे व जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता यांची प्रत्यक्ष भेट घेवून अप्पर मनार लिंबोटी धरण व बारुळ धरणातून रबी पिकाला पाणी सोडण्यासंदर्भात चर्चा केली़, परंतु या प्रश्नावर फुकटचे श्रेय लाटण्यासाठी काही मंडळी पाटबंधारे विभागात जावून ठिय्या आंदोलनाची नौटंकी करीत आहेत. आमदार या नात्याने शेतकºयांच्या प्रश्नांवर जागरुकपणे शासनस्तरावर व जिल्हा प्रशासनाला निवेदने देवून तो सोडविण्यासाठी आपण सक्षम आहोत, असेही आ.चिखलीकर म्हणाले़१६ नोव्हेंबर रोजी रबी पिकाला लिंबोटी धरणातून पाणी सोडण्याच्या संदर्भात बैठकीचे आयोजन केल्याची माहिती मिळाल्यानंतर ही नौटंकी सुरु झाली़ जनतेनी त्यांना लोकप्रतिनिधी म्हणून संधी दिली होती, त्यावेळी त्यांनी विधानसभेत किंवा इतर कुठेही शेतकºयांच्या हितासाठी तोंड उघडले नाही.राजकीय अस्तित्व संपलेल्यांनी ठिय्या आंदोलनाच्या नौटंकीने काही फरक पडणार नाही, असा टोलाही ्रआ़ प्रताप पाटील चिखलीकर यांनी लगावला.