लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : श्री विसर्जन मिरवणुकीत राजकारण शिरल्यामुळे अनेक गणेश मंडळांनी महासंघाला लक्ष्य केले. तासन्तास मिरवणुकीतील वाहने खोळंबल्यामुळे महिनाभर वेगवेगळ्या कवायतींसाठी केलेल्या मेहनतीचे चीज झाले नाही. हा भेदभाव झाल्यामुळे अनेक मंडळांनी जाहीर नाराजी व्यक्त केली. राजकीय नेत्यांनी आपापल्या मर्जीतील गणेश मंडळांना कवायती सादरीकरणासाठी जास्तीचा वेळ दिल्याचा आरोप बहुतांश मंडळांनी केला.सोयीनुसार मिरवणुकीचे मार्ग करण्यात आल्यामुळे बेशिस्त परिस्थिती निर्माण झाली. मिरवणुकीचे दोन मार्ग कुणामुळे झाले, यामागे कोण होते. यावरून खोळंबलेल्या गणेश मंडळांनी महासंघाकडे गाºहाणे केले. पुढे जाण्यावर काही मंडळांमध्ये किरकोळ वादही झाले. बालाजीनगर, गवळीपुरा, नवाबपुरा, लोधी मोहल्ला, शिवशंकर कॉलनी, भवानीनगर या भागातील मंडळांची वाहने सहा ते सात तास एकाच ठिकाणी उभी होती.कुणाचाही कुठे ताळमेळ नव्हता. महासंघातील सर्व पदाधिकारी राजकीय पक्षांशी निगडित असल्यामुळे ते पक्षाच्या व्यासपीठावर होते. त्यामुळे सिटीचौकातून मिरवणूक पुढे जाण्यास खूप उशीर झाला.यापुढे मुख्य मिरवणुकीत सहभागी व्हायचे की नाही. याबाबत विचार करावा लागेल. दुपारी २ वाजेपासून मिरवणुकीत वाहने आणली आहेत. लहान मुलांचा संच त्यामध्ये आहे. रात्री ९ वाजेपर्यंत एकाच ठिकाणी वाहने उभी आहेत. एकेक करून वाहने सोडण्याऐवजी एकाच भागातील वाहने पुढे गेल्यामुळे नियोजन कोलमडले. हे कुणामुळे झाले हे माहिती नाही; परंतु महिनाभर कवायतींसाठी परिश्रम घेतलेल्या युवकांना जर सादरीकरण न करताच जाण्याची वेळ आल्याने त्यांचा हिरमोड झाला. अनेक मंडळांना सादरीकरण करण्याची संधी मिळाली नाही. असे मत माजी महापौर तथा छत्रपती क्रीडा मंडळाचे संस्थापक त्र्यंबक तुपे यांनी व्यक्त केले. गवळीपुºयातील जनसेवा क्रीडा मंडळाच्या पदाधिकाºयांनी देखील अशीच भावना व्यक्त केली.
मिरवणुकीतही राजकारण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 07, 2017 1:22 AM