खुलताबाद : तालुक्यातील २५ ग्रामपंचायतींसाठी ४७४ उमेदवार निवडणूक रिंगणात असून शुक्रवारी मतदान होत आहे. खुलताबाद तहसील कार्यालय परिसरातून गुरुवारी दुपारी बारा वाजता कर्मचारी मतदान केंद्रावर एसटी बसने रवाना झाले.
तहसीलदार सुरेंद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील प्रत्येक मतदान केंद्रावर साहित्यासह निवडणूक निर्णय अधिकारी, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी, मतदान अधिकाऱ्यासह चतुर्थश्रेणी कर्मचारी, क्षेत्रीय अधिकारी आदी तालुक्यातील ८९ मतदान केंद्रांवर रवाना झाले.
ग्रामपंचायत निवडणुकीच्या आखाड्यात तालुक्यातून ४७४ उमेदवार आहेत. शुक्रवारी ८९ मतदान केंद्रांवर मतदान होत असून ५२८ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या प्रकियेसाठी निवडणूक निर्णय अधिकारी १३, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी १३, मतदान अधिकारी ३९२, चतुर्थश्रेणी कर्मचारी ८९, क्षेत्रीय अधिकारी ७, सहक्षेत्रीय अधिकारी ७, मास्टर ट्रेनर ७ असे ८९ मतदान केंद्रांवर ५२८ अधिकारी, कर्मचारी काम पाहणार आहेत. तालुक्यात २५ ग्रामपंचायतींसाठी एकूण ८९ मतदान केंद्रे असून या केंद्रांवर ८९ कंट्रोल युनिट (सी.यु.) , तर ९१ ईव्हीएम / बी.यु. राहणार आहेत.
तहसीलदार सुरेंद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली नायब तहसीलदार अशोक कापसे, यु. बी. मानवतकर, पी. बी. गवळी, सतीश देशमुख, विनोद जाधव, विमेश महेर, विलास वाहूळ, अमोल खंडागळे, विजय भंडारी, संतोष महापुरे, सतीश देवरे, मनोज साळुंखे, भगवान घुसळे, विजय पवार, अशोक गर्गे, भिकन मोरे आदी कर्मचारी मतदान प्रक्रियेसाठी परिश्रम घेत आहेत.
- कॅप्शन :
खुलताबाद तालुक्यातील २५ ग्रामपंचायत निवडणुकीसाठी एस.टी. बसने मतदान साहित्य घेऊन जाताना कर्मचारी.