छत्रपती संभाजीनगर : औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात १८ व्या लोकसभा निवडणूकीसाठी १३ मे रोजी मतदान होणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने आज दुपारी पत्रकार परिषदेत देशातील लोकसभेच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. राज्यात पहिल्या पाच टप्प्यात मतदान होणार आहे. जिल्ह्यात ३० लाख ३१ हजार ३१४ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यात फर्स्ट टाइम व्होटर म्हणजेच विशीच्या आतील ४१ हजार २७७ मतदार असून, ते पहिल्यांदाच मतदान करणार आहेत. एकूण मतदारांच्या तुलनेत हे प्रमाण १.३६ टक्के आहे.
१६.८६ टक्के सीनिअर व्होटरजिल्ह्यात ६० वर्षांपेक्षा अधिक वय असलेले १६.८६ मतदार आहेत. ५ लाख १० हजार ९०५ मतदार सीनिअर आहेत. ६० ते ६९ वय असलेले २,७४,९६४ मतदार आहेत. एकूण मतदारांच्या तुलनेत त्यांचे प्रमाण ९.७ टक्के आहे. ७० ते ७९ वयातील १,५१,४७१ मतदार असून, त्यांचे प्रमाण ५.०० टक्के, तर ८० हून अधिक वय असलेले ८४,४७० मतदार असून, त्यांचे प्रमाण २.७९ टक्के आहे.
थॉटर व्होटरची संख्या सर्वाधिक३० ते ६० या वयातील मतदारांना थॉटर व्होटर असे म्हटले जाते. या मतदारांची संख्या जास्त आहे. ३० ते ३९ वयातील ७ लाख ५५ हजार ३८८ मतदार आहेत. एकूण मतदारांच्या तुलनेत हे प्रमाण २४.९२ टक्के आहे. तर ४० ते ४९ या वयातील मतदारांचा आकडा ६ लाख ३२ हजार ९१२ असून, हे प्रमाणे २०.८८ टक्के आहे. ५० ते ५९ वयातील ४ लाख ६७ हजार ९३५ मतदार आहेत. त्यांचे प्रमाण १५.४४ टक्के आहे.
वयोगट..............मतदार.............टक्केवारी१८ ते १९..........४१,२७७.............१.३६ टक्के२० ते २९...........६,२२,८७९..........२०.५५ टक्के३० ते ३९..........७,५५,३८८..........२४.९२ टक्के४० ते ४९........६,३२,९१२...........२०.८८ टक्के५० ते ५९.......४,६७,९३५...........१५.४४ टक्के६० ते ६९........२,७४,९६४.........९.७ टक्के७० ते ७९........१,५१,४७१.........५.०० टक्के८० हून अधिक ...८४,४७०........२.७९ टक्केएकूण..........३० लाख ३१ हजार ३१४....१०० टक्के