मंडळाने मुंबई उच्च न्यायालयाच्या
औरंगाबाद : रॅडिको एन.व्ही. डिस्टिलरीसह आठ उद्योगांनी प्रदूषण नियंत्रण नियमांचे उल्लंघन केले आहे. प्रदूषण नियंत्रण औरंगाबाद खंडपीठात दाखल केलेल्या अहवालात ही बाब स्पष्ट केली आहे. सुखना नदी पात्रात केमिकल वेस्ट सोडून शेतकऱ्यांच्या शेतजमिनीसह धोक्यात आलेली जैव वैविध्येसंदर्भात औरंगाबाद खंडपीठात जनहित याचिका दाखल आहे. या जनहित याचिकेवर सुनावणीदरम्यान प्रदूषण नियंत्रण मंडळास सुखना नदीच्या प्रदूषणासंदर्भातील अहवाल सादर करण्याचे आदेश खंडपीठाने दिले होते. चिकलठाणा औद्योगिक वसाहतीमधील उद्योगासह इतर मार्गाने होणारे प्रदूषण व त्यावर कोणत्या उपाययोजना उद्योगांनी केल्या आहेत, यासंदर्भात माहिती देण्यास सांगण्यात आले होते. खंडपीठाने दिलेल्या निर्देशानुसार प्रदूषण नियंत्रण मंडळातर्फे सोमवारी शपथपत्राद्वारे अहवाल न्यायालयात सादर केला. या अहवालानुसार सुखना नदीच्या पात्रात घरगुती वापराचे पाणीही मोठ्या प्रमाणात सोडण्यात आल्याची नोंद घेण्यात आली आहे. नदी पात्रातील वीटभट्ट्या पूर्णपणे बंद झाल्या, नारेगावलगत मोठ्या प्रमाणात मातीचे ढिगारे व कचरा आढळून आला. शहानगर परिसरात सांडपाणी पात्रात सोडलेले आहे. काही ठिकाणी नदी पात्रात घरे बांधून अतिक्रमण