शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून बंडखोरांवर मोठी कारवाई, राज्यातील ४० नेत्यांची पक्षातून हकालपट्टी
2
आजचे राशीभविष्य, ६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कन्येसाठी काळजीचा दिवस
3
इस्रायलचा गाझामध्ये पुन्हा मोठा हल्ला! एअरस्ट्राइकमध्ये महिला-मुलांसह ३० जणांचा मृत्यू
4
सरकार 'या' कंपनीतील २.५ टक्के हिस्सा विकणार; ५०५ रुपये प्रति शेअर किंमत झाली निश्चित, जाणून घ्या
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates: मुंबईत आज इंडिया आघाडीची पहिली सभा; राहुल गांधी संबोधित करणार
6
नेमक्या कोणत्या कारणांमुळे रश्मी शुक्लांची झाली उचलबांगडी? समोर आली अशी माहिती
7
मुंबईत आव्वाज कुणाचा? उत्तर आणि उत्तर पश्चिम मुंबईत चुरशीच्या लढती, महायुती, मविआमुळे काही मतदारसंघांचे गणित बदलणार
8
भाजपाच्या विदर्भातील बालेकिल्ल्यातच प्रतिष्ठेची लढत, परिवर्तनाच्या लाटेवर काँग्रेसची भिस्त
9
सत्तेत आल्यास मुलांनाही मोफत शिक्षण, उद्धव ठाकरे यांचे आश्वासन, कोल्हापुरातून प्रचाराचा फोडला नारळ
10
'मिरज पॅटर्न' चौथ्यांदा चालेल? भाजपाच्या सुरेश खाडे यांच्यासमोर महाविकास आघाडीचे आव्हान, तानाजी सातपुते यांच्याशी लढत
11
"मविआ म्हणजे विकासाचे मारेकरी", मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा घणाघात
12
सर्वच खासगी मालमत्ता जप्तीचा सरकारला अधिकार नाही, सर्वोच्च न्यायालयाच्या नऊ न्यायाधीशांच्या खंडपीठाचा ७:२ बहुमताने निकाल
13
आता पोलिसांसह प्रत्येक सरकारी वाहनाचे चेकिंग, शरद पवारांच्या आरोपाची आयोगाकडून दखल
14
अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीत कोणता मुद्दा यावेळी ठरणार निर्णायक?
15
पती-पत्नीला एकमेकांच्या हेरगिरीची परवानगी नाही, मद्रास व हिमाचल हायकोर्टाचे मत
16
'ऑलिम्पिक २०३६'च्या आयोजनास सज्ज, भारताने आयओसीकडे सोपविले आशय पत्र
17
'टीम इंडिया ऑस्ट्रेलियात ४-० ने जिंकणार नाही...', सुनील गावसकर यांचे धक्कादायक भाकीत
18
रणजी क्रिकेट: पृथ्वी शॉ याला मुंबईच्या संघात स्थान नाहीच, श्रेयसचं पुनरागमन
19
मुंब्र्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर उभारा; फडणवीसांचं उद्धव ठाकरेंना आव्हान
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला; सतेज पाटलांसमोर शाहू महाराजांची घोषणा

औरंगाबादच्या प्रदूषण पातळीत १० ते १५ टक्के वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2018 12:46 AM

वर्गीकरण न केलेला कचरा रस्त्यावर टाकून देणे आणि नंतर त्या कचऱ्याला काडी लावून पेटवून देण्याचे प्रमाण शहरात प्रचंड वाढले असून, यामुळे तापमान तर वाढतेच आहे; पण शहराची प्रदूषण पातळी वाढण्यासही हातभार लागत आहे.

ठळक मुद्देबिघडते पर्यावरण : उन्हाची तीव्रता आणि कचरा जाळण्याचाही परिणाम भोगताहेत शहरवासीय

रुचिका पालोदकर ।लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : वर्गीकरण न केलेला कचरा रस्त्यावर टाकून देणे आणि नंतर त्या कचऱ्याला काडी लावून पेटवून देण्याचे प्रमाण शहरात प्रचंड वाढले असून, यामुळे तापमान तर वाढतेच आहे; पण शहराची प्रदूषण पातळी वाढण्यासही हातभार लागत आहे. उन्हाळ्यात कोरड्या हवेमुळे शहराची प्रदूषण पातळी वाढतच असते. त्याचप्रमाणे उन्हाळा सुरू झाल्यापासून यामध्ये १० ते १५ टक्क्यांनी वाढ झाली असून, यासाठी अनेक घटकांप्रमाणे कचरा जाळणे हा घटकही कारणीभूत आहे. दिवसेंदिवस वाढत जाणारी ही समस्या आता शहरवासीयांच्या आरोग्यावरही घातक परिणाम करीत आहे.शहरात कचºयाची समस्या निर्माण झाल्यापासून प्रत्येक वॉर्डात फिरून कचरा गोळा करणारे महानगरपालिकेचे सफाई कर्मचारी एकत्रित कचरा घेण्यास नकार देतात. कचरा वर्गीकरण करून द्यावा, एवढी या लोकांची अपेक्षा आहे. मात्र अनेक भागांतील नागरिकांना या गोष्टीचा कंटाळा असल्यामुळे किंवा काही भागांत घंटागाडी पोहोचत नसल्यामुळे नागरिक हा कचरा रस्त्याच्या दुभाजकांवर किंवा मग परिसरातील मोकळ्या जागेवर जमा करतात आणि सर्रास पेटवून देतात.सायंकाळी वातावरण थंड झाल्यावर किंवा अगदी पहाटेच हा कचरा जाळला जातो. कचरा जाळताना त्यात ओला कचरा, सुका कचरा, सॅनिटरी वेस्ट, प्लास्टिक चे तुकडे, अशा सर्वच प्रकारचा कचरा एकत्र असतो. एकदा कचरा जाळल्यानंतर पुढे चार ते पाच तास तो धुमसत राहतो आणि त्या धुरातून बाहेर पडणारे विषारी वायू पर्यावरणाचा समतोल बिघडविण्याचे काम करतात.उन्हाळा असल्यामुळे उन्हाची तीव्रता कमी होऊन वातावरण थंड झाले की, अनेक ज्येष्ठ नागरिक फेरफटका मारण्यासाठी आणि लहान मुले खेळण्यासाठी घराबाहेर पडतात. पण जळणाºया कचºयामुळे मात्र नाक बंद करूनच बाहेर पडावे लागत असल्याचे ज्येष्ठांनी सांगितले.आरोग्यासाठी धोकादायकमोकळ्या हवेत कचरा जाळल्यामुळे त्यातून डायआॅक्झिन्स, सल्फर, पारा, कार्बन मोनोक्साईड, नायट्रोजन आॅक्साईड, अर्सेनिक, असे घातक वायू वातावरणात प्रवेश करतात. हे वायू श्वसनासोबत थेट शरीरात जाऊन श्वसन क्रियेवर परिणाम करतात. यामुळे हृदयावरही परिणाम होऊ शकतो. दमा, अस्थमा हे आजार असणाºयांसाठी, ज्येष्ठांसाठी आणि लहान बालकांसाठी हे वायू अत्यंत घातक आहेत. डोळे चुरचुरणे, मळमळणे, डोके जड पडणे, अंगावर रॅश येणे, असे आजारही या धुरामुळे होऊ शकतात.

टॅग्स :pollutionप्रदूषणAurangabadऔरंगाबादGarbage Disposal Issueकचरा प्रश्न