उपळी : शनिवारी सायंकाळी पिशोर परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे उपळी येथील अंजना नदीवरील पूल पुराच्या पाण्याने खचला. यामुळे उपळी, भराडी, लोणवाडी, पळशी, मांडगाव या गावांचा संपर्क तुटला आहे.वाहतुकीची अडचण येत असल्याने नागरिकांना २० कि.मी.चा फेरा मारुन जावे लागत आहे. परिसरातील लहान मुलांना भराडी येथे शाळेत जावे लागते. या पुलामुळे विद्यार्थ्यांनाही हा फेरा मारुन जावे लागेल, असे नागरिकांनी सांगितले. शनिवारी मध्यरात्री पुराने उपळी गावाला वेढा घातला होता. नदीकाठावर राहणाऱ्या नागरिकांना ग्रामस्थांनी घरातील सामान सुरक्षित स्थळी हलवून मदत केली. पुलाची तात्पुरती दुरुस्ती करून नागरिकांचा २० कि.मी.चा हेलपाटा वाचवावा, अशी मागणी उपळीच्या सरपंच मीराबाई सुरडकर, उपसरपंच भगवान नाईक, साहेबराव शेजूळ, उमेश शेजूळ, हिराजी शेजूळ, पवन शेजूळ, राजेंद्र सुरडकर व नागरिकांनी केली आहे.
उपळीमधील पूल पुराने गेला वाहून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2018 1:18 AM