जानेवारीमध्ये झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत उपसभापती संपत छाजेड सदस्य म्हणून विजयी झाले होते. नियमानुसार एकाच वेळी दोन पदांवर काम करता येत नसल्याने त्यांनी २७ जानेवारी रोजी आपल्या उपसभापती पदाचा राजीनामा दिला होता. तेव्हापासून हे पद रिक्त आहे. २५ मार्च रोजी सदरील निवडणूक घेण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी आदेशानुसार सर्व मतदारांचे निवडणुकीच्या ७२ तास आधी आरटीपीसीआर चाचणी केलेले प्रमाणपत्र बंधनकारक करून कोविड नियमांचे पालन करत उपसभापती पदाची निवडणूक घेण्याचे सूचित केले. तरीदेखील उपसभापती पदाची निवडणूक घेण्यात आली नाही. त्यामुळे चार महिन्यांपासून पंचायत समितीचा कारभार उपसभापतीविनाच सुरू आहे. एकूण १८ सदस्य संख्या असलेल्या पंचायत समितीमध्ये सध्या भाजपचे नऊ तर सेनेचे आठ सदस्य आहेत. छाजेड यांनी राजीनामा दिल्याने सेनेचा एक सदस्य कमी झालेला आहे.
गंगापूर पंचायत समितीचे उपसभापतीपद चार महिन्यांपासून रिक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 03, 2021 4:04 AM