औरंगाबाद : महाराष्ट्रात होऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुकीमुळे पदवी व पदव्युत्तर परीक्षा लांबणीवर टाकण्याच्या हालचाली सुरू झाल्या असून, २३ सप्टेंबर रोजी होणाऱ्या परीक्षा मंडळाच्या बैठकीत नवीन वेळापत्रकास मंजुरी घेतली जाणार आहे. यासंदर्भात माहिती अशी की, महाविद्यालयांमध्ये शिकविले जाणारे सर्व पदवी अभ्यासक्रम तसेच विद्यापीठ व अन्य संस्थांमध्ये शिकविले जाणारे सर्व पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या परीक्षा ८ आॅक्टोबरपासून घेण्याचे नियोजन डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने केले होते. दरम्यान, महाराष्ट्रात विधानसभेची निवडणूक १५ आॅक्टोबर रोजी असून, १९ आॅक्टोबर रोजी मतमोजणी आहे. निवडणुकीच्या कामासाठी महाविद्यालयीन तसेच विद्यापीठातील कर्मचारी, प्राध्यापकांना नेमले जाते. शिवाय महाविद्यालयांच्या इमारतीही ताब्यात घेतल्या जातात. त्यामुळे विद्यापीठाने ८ आॅक्टोबरपासून घेतल्या जाणाऱ्या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. निवडणुका पार पडत नाहीत तोच २२, २३ आणि २४ आॅक्टोबर रोजी दिवाळी सणाच्या सुट्या आहेत. त्यामुळे विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या परीक्षेसाठी २९ आॅक्टोबर ही तारीख निश्चित केली आहे. २९ आॅक्टोबर ते २४ नोव्हेंबरपर्यंत या परीक्षा चालतील. सर्व परीक्षा या कॉपीमुक्त, पारदर्शी व मुक्त वातावरणात पार पडण्यासाठी विद्यापीठाने तयारी सुरू केली असून, या सर्व नवीन बदलास परीक्षा मंडळाच्या बैठकीत मान्यता घेतली जाईल. कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांनी २३ सप्टेंबर रोजी परीक्षा मंडळाची तातडीची बैठक बोलावली असल्याचे सूत्रांनी सांगितले.चुकीच्या गुणपत्रिकाबी. कॉम.च्या ज्या विद्यार्थ्यांनी आपले पेपर रिड्रेसलला टाकले होते. त्यांना ‘एमकेसीएल’च्या तांत्रिक अडचणीमुळे उत्तीर्ण असतानाही अनुत्तीर्ण अशा गुणपत्रिका मिळाल्या. जवळपास ४० विद्यार्थ्यांना अनुत्तीर्ण गुणपत्रिका मिळाल्यामुळे त्या पुणे येथून दुरुस्त करून आणण्यास विलंब झाला होता.९ सप्टेंबर रोजी विद्यापीठाने गुणपत्रिका टपालाद्वारे महाविद्यालयांना पाठविल्या. दरम्यान, दुसरीकडे पदव्युत्तर प्रवेशाची मुदतही संपुष्टात आली. प्रवेशासाठी त्रस्त विद्यार्थ्यांनी आज कुलगुरूडॉ. बी. ए. चोपडे यांची भेट घेतली.
पदवी परीक्षा लांबणीवर
By admin | Published: September 20, 2014 12:08 AM