लोकमत न्यूज नेटवर्कवाळूज महानगर : वाळूज एमआयडीसी, कामगार चौक रोडवर गुरुवारी दोन ट्रक विद्युत खांबावर धडकल्यामुळे या परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला. तब्बल दोन तास वीजपुरवठा बंद पडल्यामुळे उद्योजकांचे जवळपास १ कोटीचे नुकसान, तर महावितरणचा १५ लाखांचा महसूल बुडाल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.वाळूज एमआयडीसीतील कामगार चौक ते कोकाकोला रोडवर गुरुवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास ट्रक (क्र. एम.एच.२८, बी.७४९६) व दुसरी ट्रक (क्र.एम.एच.१२, ई.एफ.९६६९) या विरुद्ध दिशेने जाणाºया ट्रक कामगार चौकाकडे वळण घेत असताना बडवे चौफुलीजवळील विद्युत खांबावर जाऊन धडकल्या.या अपघातामुळे दोन्ही विजेचे खांब वाकले असून, नूपुन फीडरवरील वीजपुरवठा बंद पडला. या अपघाताची माहिती मिळताच महावितरणचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता दीपक माने, सहायक अभियंता मनीष दिघुळे जवळपास १० जनमित्र व वाहतूक शाखा व एमआयडीसी वाळूज एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन दोन्ही अपघातग्रस्त ट्रक क्रेनच्या मदतीने इतरत्र हलविल्या.प्रत्यक्षदर्शीने दिलेल्या माहितीनुसार एक ट्रकचालक मोबाइलवर बोलत असताना हा अपघात घडला. महावितरण व पोलीस प्रशासनाने तात्काळ घटनास्थळ गाठून अपघातग्रस्त ट्रक बाजूला हटविल्यामुळे पुढील अनर्थ टळला.या अपघातामुळे दोन खांब वाकले असून, विद्युत ताराही लोंबकळल्यामुळे जवळपास ५० हजारांचे नुकसान झाले.महावितरणचे अधिकारी व कर्मचाºयांनी शर्थीचे प्रयत्न करून तात्पुरत्या स्वरूपात वीजपुरवठा सुरळीत केला. जवळपास दोन तास वीजपुरवठा बंद पडल्यामुळे महावितरणचा १५ लाखांचा महसूल बुडाल्याचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता दीपक माने यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.
अपघातामुळे वीजपुरवठा खंडित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2017 12:57 AM