२५ जूनपासून प्रवेश प्रक्रिया सुरू होत आहे. या विद्यालयात सर्व जातींच्या मुलांना प्रवेश दिला जाणार असून, यावर्षी जैन समाजातील ६-१३ वयोगटातील २०-२५ मुलेच ठेवली जाणार आहेत. २ जुलैपासून निवास व शिक्षण व्यवस्था सुरू होणार आहे. त्यामुळे प्रथम येणाऱ्यास प्राधान्याने प्रवेश दिला जाईल, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष अशोक कोठारी (हैदराबाद), कार्याध्यक्ष सुभाष मुथा (पुणे), उपाध्यक्ष ॲड. सुनील कोचेटा (लातूर), सेक्रेटरी राजेंद्र पोखर्णा (परभणी), सदस्य ओमप्रकाश पोखर्णा (नांदेड), पारस बाफना (औरंगाबाद) यांनी दिली, तसेच या प्रकल्पास मदत करण्यास इच्छुकांनी या मानवसेवेच्या महायज्ञात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. अधिक माहितीसाठी व प्रवेशासाठी संयोजक संजय बाफना (८३२९८२८५६०), जिनेशा जैन (९४२०५४० ५४१) यांच्याशी संपर्क साधावा.
गरजू, निराधार मुलांसाठी प्रभा प्रतिभा गुरुकुलम विद्यालय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2021 4:02 AM