लोकमत न्यूज नेटवर्कपैठण : गोदावरीच्या नागघाटावर कर्तव्य बजावणा-या होमगार्डने बुडणा-या वारक-यास पाण्यात उडी घेऊन वाचविले; परंतु पाण्याच्या बाहेर येताच हृदयविकाराच्या झटक्याने या होमगार्डची प्राणज्योत मालवली. ही हृदयद्रावक घटना गुरुवारी सकाळी गोदापात्रात घडली. शिवशक्ती मेवाशिंग कनोज (४०, रा. पैठण) असे या होमगार्डचे नाव आहे.सध्या पैठण येथे नाथषष्ठी सोहळा सुरू असल्याने राज्यातील लाखो वारकरी येथे दाखल झाले असून, पवित्र स्नानासाठी ते गोदावरी नदीवर गर्दी करतात. यामुळे प्रशासनाने खबरदारी म्हणून गोदापात्र व जायकवाडी धरणावर बचाव पथक नेमले आहे.होमगार्ड शिवशक्ती कनोज यांना नागघाटावर ड्यूटी देण्यात आली होती. सकाळी नागघाटावर मोठ्या संख्येने भाविक व वारकरी स्नानासाठी गोदापात्रात उतरले होते. दरम्यान, एक वारकरी पाण्यात बुडत असल्याने उपस्थित भाविकांनी आरडाओरडा केला.त्याच वेळी शिवशक्ती यांनी त्या भाविकास वाचविण्यासाठी लगेच पाण्यात उडी घेतली व भाविकास पाण्याबाहेर काढले.भाविकाचा जीव वाचविल्यानंतर शिवशक्ती नागघाटावरील पायºया चढून वर आले तेव्हा त्यांना थकवा जाणवला म्हणून ते खाली बसले. त्याच वेळी त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला व उपचारापूर्वीच जागेवरच त्यांची प्राणज्योत मालवली.सर्पमित्र होमगार्डच्या बलिदानास ‘सलाम’शिवशक्ती कनोज हे सर्पमित्र म्हणून सर्वत्र परिचित होते. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, मुलगा, दोन बहिणी, एक भाऊ असा परिवार आहे.कर्तव्य पार पाडताना स्वत:चा जीव जाण्याअगोदर काही क्षण आधी एक जीव वाचविणाºया शिवशक्तीच्या बलिदानास पैठणकरांनी आज मनातून ‘सलाम’ केला.मयताच्या परिवारास शासनाने मदत करण्याची मागणीशासनाने मदत करून सच्चाईने कर्तव्य बजावणाºया होमगार्डच्या परिवारास सर्वतोपरी मदत करावी, अशी मागणी उपस्थित लाखो वारकºयांसह शहरवासीयांनी केली.तीन वर्षांपूर्वीही नाथषष्ठीत विझविली होती त्यांनी आगतीन वर्षांपूर्वीही नाथषष्ठीदरम्यान नाथमंदिर परिसरातील जनरेटर पेटले होते. तेव्हाही शिवशक्ती कनोज यांनी जीव धोक्यात घालून धुराच्या लोटात जाऊन जनरेटर बंद करून आग विझविली होती. अत्यंत सेवाभावी असलेल्या शिवशक्ती कनोज यांच्या अचानक झालेल्या निधनामुळे पैठण शहरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
गोदावरीच्या नागघाटावर वारक-याला वाचवताना होमगार्डने गमावला प्राण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 09, 2018 12:18 AM