शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde : अडचणीची परिस्थिती वा द्विधा मनःस्थिती; एकनाथ शिंदे जातात सातारच्या गावी! यावेळी काय घडणार?
2
तिढा सुटेना, महायुतीचे नेते पुन्हा दिल्लीला जाणार, का होतोय सत्तास्थापनेस उशीर? 
3
एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चा; राजकीय गदारोळात उदय सामंतांकडून महत्त्वाचा खुलासा
4
गोंदिया-कोहमारा मार्गावर शिवशाही बसचा भीषण अपघात! ११ जणांचा मृत्यू; मुख्यमंत्र्यांकडून मदत जाहीर
5
"वाढीव मतदानाचे व्हिडीओ चित्रीकरणासह पुरावे सादर करा", नाना पटोलेंचं निवडणूक आयोगाला पत्र
6
"लॉरेन्स बिश्नोईचा जेलमधून शूटर्सना कॉल; म्हणाला, पोलिसांना घाबरु नका, आपल्याकडे वकिलांची फौज"
7
PAN 2.0 नंतर सरकार आता EPFO 3.0 आणण्याच्या विचारात; ATM मधूनच करता येणार 'हे' काम
8
Maharashtra Politics : मोठी बातमी! महायुतीची बैठक रद्द, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साताऱ्याला जाणार
9
भारतीय गुंडांचा अमेरिकेत 'डंकी'पद्धतीने प्रवेश; लॉरेन्स बिश्नोई टोळीचेही आवडते ठिकाण बनले
10
रोल्स रॉयस घ्यायची असेल तर डाऊन पेमेंट किती करावे लागणार? EMI किती बसणार... जाणून घ्यायला काय हरकत आहे...
11
Shubman Gill कमबॅकसाठी सज्ज; हा घ्या तो १०० टक्के फिट असल्याचा पुरावा (VIDEO) 
12
EPFO कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; ३० नोव्हेंबरपर्यंत करा 'हे' काम; अन्यथा होईल मोठं नुकसान
13
अमित शाहांच्या भेटीवेळी चेहऱ्यावर नाराजी, व्हायरल होत असलेल्या फोटोबाबत एकनाथ शिंदे म्हणाले...  
14
गुजरातमध्ये बनावट ऑस्ट्रेलियन डॉलर्सची छपाई, पोलिसांनी चौघांना घेतले ताब्यात
15
'कोणतीही कारवाई करू नका'; जामा मशीद प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचे कनिष्ठ न्यायालयाला निर्देश
16
F&O मध्ये ४५ नवे स्टॉक्स : Paytm, जिओ, फायनान्शिअल, LIC; Yes Bank सारख्या शेअर्सची एन्ट्री, काय फरक पडणार?
17
PM मोदींच्या सुरक्षेसाठी महिला 'एसपीजी कमांडो', काय आहे व्हायरल फोटोचं सत्य?
18
गोंदियात भीषण अपघात! शिवशाही बस उलटली, ११ जणांचा मृत्यू; मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
19
हळद लागली! शोभिता धुलिपालाला लागली चैतन्यच्या नावाची हळद, समोर आले प्री वेडिंगचे फोटो
20
Maharashtra News: भाजपला एकनाथ शिंदेंच हवेत उपमुख्यमंत्री, काय आहे कारण?

अपंग संघटनेच्या जिल्हाध्यक्षांवर ‘प्रहार’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 02, 2017 12:41 AM

प्रहार अपंग क्रांती आंदोलनचे जिल्हाध्यक्ष शिवाजी गाडे यांना मंगळवारी (दि.१) सकाळी १० वाजता घाटी रुग्णालयात सुरक्षारक्षकांकडून मारहाण झाली.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : प्रहार अपंग क्रांती आंदोलनचे जिल्हाध्यक्ष शिवाजी गाडे यांना मंगळवारी (दि.१) सकाळी १० वाजता घाटी रुग्णालयात सुरक्षारक्षकांकडून मारहाण झाली. त्यात गाडे यांच्या डोक्याला जबर दुखापत झाली. या घटनेनंतर तीव्र संताप व्यक्त करीत गाडे यांच्यासह अपंगांनी वैद्यकीय अधीक्षकांच्या कार्यालयासमोर ठिय्या मांडला. यामुळे घाटीमध्ये तणावपूर्ण वातावरण झाले.प्रहार अपंग क्रांती आंदोलनचे मंगळवारी जिल्हा परिषदेत आंदोलन होते. त्याविषयी माहिती देण्यासह एका अपंग महिलेस अपंग प्रमाणपत्र काढण्यास अडचण येत असल्याने मदत करण्यासाठी शिवाजी गाडे हे सकाळी १० वाजता घाटीतील बाह्यरुग्ण विभागातील अपंगांचा वॉर्ड ११७ मध्ये गेले होते. यावेळी सदर महिला सोबत होती. या ठिकाणी महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाचे दोन सुरक्षारक्षक तैनात होते. गाडे यांना सुरक्षारक्षकांनी हटकले. सदर महिलेसोबत आल्याचे गाडे यांनी सांगितले; परंतु सुरक्षारक्षकांनी त्यांना तेथे थांबण्यास मज्जाव केला. यावरून त्यांच्यात शाब्दिक वाद झाला.सुरक्षारक्षकांनी धक्काबुक्की करीत गाडे यांच्या पायावर काठी मारली. यामुळे त्यांच्या डोक्याला मार लागला. रक्तस्त्राव सुरूझाला, अशा अवस्थेत गाडे आणि अपंगांनी थेट वैद्यकीय अधीक्षक सुधीर चौधरी यांच्या कार्यालयासमोर ठिय्या मांडला. त्यामुळे तणाव निर्माण झाला. पोलिसांनी घाटीत धाव घेतली.सुरक्षारक्षकांवर कारवाई करण्याची मागणी गाडे आणि इतर अपंगांनी केली. वैद्यकीय अधीक्षकांच्या कक्षातच गाडे यांच्यावर उपचार करण्यात आले. शिवाजी गाडे यांनी बेगमपुरा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. संजय सातव आणि विकास काळदाते अशी सुरक्षारक्षकांची नावे आहेत, अशी माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुधीर चौधरी यांनी दिली.