विद्यमान सभापती रुस्तुलबी पठाण यांनी राजीनामा दिल्याने शुक्रवारी सभापती निवडीची प्रक्रिया झाली. प्रारंभी भाजपच्या लता विकास राठोड यांनी सभापती पदासाठी अर्ज दाखल केला होता. ऐनवेळी त्यांनी माघार घेतल्याने प्रतिभा जाधव यांची बिनविरोध निवड झाली. पंचायत समितीच्या सभागृहात निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी माधुरी तिखे यांच्या अध्यक्षतेखाली निवड झाली.
यावेळी गटविकास अधिकारी सुदर्शन तुपे, पंचायत समिती सदस्य रुस्तुलबी उस्मानखाँ पठाण, साहेबराव जंगलू गायकवाड, धरमसिंग चव्हाण, प्रतिभा जाधव, लता राठोड, संजीवन सोनवणे यांची उपस्थिती होती.
राज्यमंत्री अब्दुल यांच्याहस्ते सभापती प्रतिभा जाधव यांचा, तसेच जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत विजयी झालेल्या सुरेखा काळे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख राजेंद्र राठाेड, तालुका प्रमुख प्रभाकर (आबा) काळे, तालुका संघटक दिलीप मचे, शहर प्रमुख संताेष बाेडखे, शिवअप्पा चाेपडे, उस्मानखाँ पठाण, श्रीराम पाटील, राजमल पवार, ॲड. याेगेश पाटील, राधेश्याम राठाेड, भगवान वारुने, रमेश गावंडे, दिलीप देसाई, गजू चाैधरी, माेतिराम पंडित, कृष्णा गाेळेगावकर, सीताराम जामटीकर आदी शिवसैनिकांची उपस्थिती होती.
--
नवनिर्वाचित सभापती प्रतिभा जाधव, सुरेखा काळे यांच्या सत्काराप्रसंगी उपस्थित राज्यमंत्री अब्दुल सत्तार.