औरंगाबाद : नियतीच्या पोटात काय दडलेले असते, हे कुणालाच कळत नाही. नियती आपला डाव साधते व माणूस हतबल बनून राहतो. सिडको एन-३ येथील व्यावसायिक ओमप्रकाश खन्ना यांचे वयाच्या ८८व्या वर्षी बुधवारी (दि. ८) निधन झाले. त्यांनी डोळे मिटण्यापूर्वीच एका तपापूर्वीच मुलगा व नातवावर काळाने घाला घातला. त्या दोघांना खांदा द्यावा लागलेल्या खन्ना यांच्या पार्थिवास सून व कन्येने अग्नीडाग दिला. ( The old man's daughter and daughter-in-law gave a facelift )
नियतीचा उफराटा न्याय काय असतो तो बघा. खन्ना यांचा मुलगा प्रेमप्रकाश व नातू जेनेश याचे अकाली निधन झाले. या दोघांच्याही पार्थिवावर खन्ना यांना अंत्यसंस्कार करावे लागले. आर्यसमाजी असलेल्या खन्ना यांनी तसा आपली मुलगा व मुलगीमध्ये भेद केला नव्हताच. मुलगा गेल्यानंतर त्यांनी सुनेलाच मुलगा मानले. एवढेच नव्हे तर ते तिला मुलाच्या नावाने संबोधत. त्यांच्या पार्थिवावर कोण अंत्यसंस्कार करणार असा प्रश्न नातेवाईकांनी उपस्थित केला तेव्हा, मुलगी सीमा मेहरा व सून नीलम खन्ना दोघी समोर आल्या. त्यांनी सिडको एन ६ येथील स्मशानभूमीत पार्थिवावर अंत्यसंस्कार केले. तेव्हा उपस्थितांच्या डोळ्यात अश्रू तरळले. आर्य समाजाचे अध्यक्ष म्हणूनही कार्य केलेल्या खन्ना यांना विवाहित तीन मुली आहेत. एक औरंगाबादेत, दुसरी दिल्लीत, तर तिसरी इंग्लंडला राहाते. अंत्यविधी हा वैदिक पद्धतीने करण्यात आला. पुढील विधीही आम्ही दोघीच करणार असल्याचे नीलिमा खन्ना यांनी सांगितले.
सर्व समाजाला संदेशमुलाने वडिलांच्या पार्थिवास खांदा देण्याची रित आहे. पण जेव्हा मुलगा नसेल तेव्हा काय? अशावेळी मुलगी, सून यांनीच पुढे येऊन पार्थिवाला अग्नी दिला पाहिजे. यातूनच सामाजिक परिवर्तन घडू शकते.- ॲड. जोगेंद्रसिंह चौहाण, कोषाध्यक्ष, आर्य समाज