लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : जगप्रसिद्ध अजिंठा-वेरूळ लेण्यांमुळे थायलंडहून औरंगाबादेत येणाऱ्या पर्यटकांची संख्या मोठी आहे. त्यामुळे थायी आणि बुद्धिस्ट टुरिझम वाढविण्यासाठी थायलंड सरकारतर्फे प्राधान्य दिले जात आहे. औरंगाबाद जिल्ह्यात थायी विहारे, बुद्धिस्ट सेंटरसह आगामी कालावधीत बँकॉकहून थेट औरंगाबाद हवाई कनेक्टिव्हिटीसाठी प्रयत्न केला जाईल, असे थायलंडचे काऊन्सिल जनरल इकापोल पुलपीपट म्हणाले.चेंबर आॅफ मराठवाडा इंडस्ट्रीज अॅण्ड अॅग्रीकल्चरच्या (सीएमआयए) उद्योजकांशी इकापोल पुलपीपट यांनी शनिवारी (दि.२१) संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. ‘सीएमआय’चे अध्यक्ष राम भोगले, नितीन गुप्ता, कमलेश धूत, महाराष्ट्र चेंबर आॅफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अॅण्ड अॅग्रीकल्चरचे (एमएसीसीआयए) सुहास दाशरथी, प्रसाद कोकीळ, टुरिझम प्रमोटर्स गील्डचे अध्यक्ष जसवंतसिंग, ‘मसिआ’चे अभय हंचनाळ, मनीष गुप्ता, अजय शहा, सुनील रायठ्ठा, केशव पारटकर, तनसुख झांबड आदी उपस्थित होते.राम भोगले, सुहास दाशरथी यांनी प्रारंभी थायलंड सरकारकडून अपेक्षित असलेल्या बाबी नमूद केल्या. औरंगाबाद ही उद्योग आणि पर्यटननगरी आहे. देश-विदेशांत विविध मालाची निर्यात केली जाते. मराठवाड्यातही उद्योगवाढीसाठी प्राधान्य देण्याची मागणी करण्यात आली.थायलंडमध्ये बौद्ध धर्म रुजलेला आहे. वेरूळ, अजिंठा लेणीला थायलंडचे पर्यटक भेट देतात. त्यामुळे भारत, श्रीलंका आणि थायलंड या बुद्धिस्ट सर्किटमुळे पर्यटनक्षेत्रात मोठ्या संधी आहेत. बँकॉकहून थेट औरंगाबादेत विमानसेवा सुरू करण्यास आम्ही केव्हाही तयार आहोत; परंतु थायलंडहून येणाºया विमानात किमान ८० टक्के प्रवासी हवेत, अशी अट भारत सरकारने घातली आहे. ही अट दूर केल्यास बँकॉक- औरंगाबादला थेट विमानसेवेचा मार्ग मोकळा होईल,असे ते म्हणाले.श्रीलंकेतून औरंगाबादला थेट विमानसेवा सुरू करायची असल्यास कोणत्याही परवानगीची गरज नाही. याच धर्तीवर थायलंडहून औरंगाबादेत विमानसेवा सुरू करण्यासाठी परवानगीची आवश्यकता राहणार नसल्याचे भोगले यांनी इकापोल पुलपीपट यांच्या निदर्शनास आणून दिले.औरंगाबाद जिल्ह्यात थायलंड सरकार, थायी सांस्कृतिक मंत्रालयाच्या माध्यमातून थायी विहार, बुद्धिस्ट सेंटर उभारण्यास प्राधान्य दिले जात आहे. त्यातून पर्यटनवाढीस आणखी चालना मिळेल,असे ते म्हणाले.
थायी, बुद्धिस्ट टुरिझम वाढीला प्राधान्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2018 12:09 AM
जगप्रसिद्ध अजिंठा-वेरूळ लेण्यांमुळे थायलंडहून औरंगाबादेत येणाऱ्या पर्यटकांची संख्या मोठी आहे. त्यामुळे थायी आणि बुद्धिस्ट टुरिझम वाढविण्यासाठी थायलंड सरकारतर्फे प्राधान्य दिले जात आहे. औरंगाबाद जिल्ह्यात थायी विहारे, बुद्धिस्ट सेंटरसह आगामी कालावधीत बँकॉकहून थेट औरंगाबाद हवाई कनेक्टिव्हिटीसाठी प्रयत्न केला जाईल, असे थायलंडचे काऊन्सिल जनरल इकापोल पुलपीपट म्हणाले.
ठळक मुद्देइकापोल पुलपीपट : बुद्धिस्ट सेंटर, बँकॉक विमानसेवेसाठी प्रयत्न