बिलोणी येथील रहिवासी शिंदे कुटुंबीय तित्तरखेडा येथे दुचाकीवरून गेले होते. येथून ते परत घरी येत असताना टुणकी गावाजवळ दुचाकी घसरल्याने गर्भवती महिला जखमी झाली. मदत न मिळाल्याने ती रस्त्यावरच बराच वेळ पडून होती. शिवूर पोलीस ठाण्याचे गोपनीय शाखेचे कर्मचारी पोलीस नाईक, अविनाश भास्कर व पोलीस काॅन्स्टेबल किरण रावते हे दोघे लोणी येथून शिवूर बंगल्याकडे येत होते. त्यावेळी त्यांना टुणकी गावाजवळ बिलोनी गावातील एक महिला रोडच्या कडेला पडलेली दिसली. तिचा पती वाहनाला हात देऊन थांबण्याचा प्रयत्न करत होता. परंतु, कोणीही वाहने थांबवित नव्हते. तेव्हा पोलिसांनी धाव घेत त्यांची आस्थेवाईकपणे चौकशी केली. त्यानंतर खासगी वाहनातून त्यांनी सदर महिलेस शिवूर येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. त्यामुळे महिलेच्या जीवाचा धोका टळला.
दुचाकीवरून पडून गर्भवती महिला जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2021 4:04 AM