शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट
2
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
आधी ‘बटेंगे तो कटेंगे’ला विरोध, आता मोदींच्या सभेला दांडी, अजित पवारांच्या मनात चाललंय काय?  
4
IND vs SA: मालिका जिंकण्यासाठी मोठा निर्णय? Rinku Singh संघाबाहेर, 'या' स्टार खेळाडूला संधी
5
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
6
विशेष लेख: गणिते बिघडली, झोप उडाली.. युती की आघाडी?
7
पोलिसांनी शूटरलाच विचारले ‘कोणाला पाहिलं काय?’; बाबा सिद्दिकी प्रकरणातील धक्कादायक माहिती उघड
8
गजकेसरी योगात सूर्य-शनी गोचर: ७ राशींना अनुकूल, सकारात्मक काळ; लक्ष्मी कृपा अन् यश प्रगती!
9
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
10
तरुणीने बोलावले म्हणून लॉजवर गेला; मात्र नंतर तरुणासोबत घडला धक्कादायक प्रकार!
11
अग्निशमन दलातील माणसांचं वेदनादायी आयुष्य! 'अग्नी'चा ट्रेलर; जितेंद्र जोशी-सई ताम्हणकरची खास भूमिका
12
... म्हणून मोदी सरकारला आहे सरकारी कंपन्यांचा अभिमान, जाणून घ्या गेल्या ९ वर्षांत किती झाली प्रगती
13
Maharashtra Election 2024 Live Updates: 'लाडकी बहीण'सारख्या योजनांचे सरकारने नीट नियोजन केलं आहे- मुख्यमंत्री शिंदे
14
सोयाबीनला सहा हजाराचा हमीभाव देणार; PM मोदींची मोठी घोषणा
15
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
16
Ola Electric CCPA Notice : Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
17
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
18
"एक माणूस म्हणून तो...", इब्राहिमसोबतच्या नात्यावर पलक तिवारीने केलं होतं भाष्य
19
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
20
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!

नवीन ८ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांतील प्रवेशासाठी तयारी, ८०० जागा वाढण्याची शक्यता

By संतोष हिरेमठ | Published: September 18, 2024 7:46 PM

याच वर्षी प्रवेशप्रक्रियेसाठी तयारी, त्रुटी निघाली नाही तर यावर्षी कमी शुल्कात घडतील आणखी ८०० भावी डाॅक्टर

छत्रपती संभाजीनगर : राज्यात प्रत्येकी १०० विद्यार्थी प्रवेश क्षमतेच्या ८ नवनिर्मित शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांत २०२४-२५ या शैक्षणिक वर्षासाठी प्रवेशप्रक्रियेसाठी प्रयत्न सुरू आहेत. आगामी १५ दिवसांत कोणत्याही त्रुटी निघाल्या नाही तर प्रवेशप्रक्रियेचा मार्ग मोकळा होईल आणि कमी शुल्कात ८०० भावी डाॅक्टर घडतील. प्रवेशप्रक्रियेत अडचण आली तर विद्यार्थ्यांना लाखो रुपये मोजून खासगी वैद्यकीय महाविद्यालयाचा रस्ता धरावा लागेल.

नव्या ८ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांसाठी उसनवारी तत्त्वावर राज्यभरातील जवळपास ६२ सहयोगी, सहायक आणि प्राध्यापकांची सेवा वर्ग करण्यात आली आहे. यात छत्रपती संभाजीनगरातील घाटी रुग्णालयातील ९ डाॅक्टरांचा समावेश आहे. प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी आवश्यक शिक्षकांचा यात समावेश आहे. या ८ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांत तिसऱ्या राउंडपर्यंत प्रवेशप्रक्रिया सुरूू करण्यासाठी शासनाकडून प्रयत्न सुरू आहेत.

राज्यातील एकूण शासकीय वैद्यकीय महाविद्यालये- ३३शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांतील एकूण जागा- ५०५०एकूण खासगी वैद्यकीय महाविद्यालये- २२खासगी वैद्यकीय महाविद्यालयांतील एकूण जागा- ३१७०

शुल्काची स्थितीशासकीय वैद्यकीय महाविद्यालय- सुमारे १.५२ लाख रु.खासगी वैद्यकीय महाविद्यालय- ५ लाख ते १५ लाख रु.

ही आहेत नवीन ८ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयेशहर -जागाजालना- १००भंडारा- १००हिंगोली- १००बुलढाणा- १००गडचिरोली- १००अमरावती- १००अंबरनाथ- १००वाशिम- १००

...तर यावर्षीच प्रवेशप्रक्रियाजालना येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाने नमूद केलेल्या बाबींची पूर्तता करण्यात आली आहे. अंबड रस्त्यावरील गणेशनगर येथील २६ एकर जागेवर इमारतीच्या बांधकामाची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली. लवकरच बांधकाम सुरू होईल. जिल्हा रुग्णालयासोबत सामंजस्य करार झाला असून, ‘एमबीबीएस’च्या विद्यार्थ्यांना येथे चिकित्सालयीन प्रशिक्षण देण्यात येईल. विद्यार्थ्यांचे वर्ग सुरू होण्यासाठी इमारत भाड्याने घेण्यात आलेली आहे. चालू शैक्षणिक वर्षात मान्यता मिळण्यासाठी केंद्रीय आरोग्य व कुटुंबकल्याण विभागाकडे द्वितीय अपील असून, पुढील आठवड्यात त्याची सुनावणी अपेक्षित आहे. मान्यता मिळाल्यास चालू शैक्षणिक वर्षात प्रवेशप्रक्रिया सुरू होईल, अशी आशा आहे.- डाॅ. सुधीर चौधरी, अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जालना

टॅग्स :doctorडॉक्टरAurangabadऔरंगाबादEducationशिक्षण