लोकमत न्यूज नेटवर्कदेगलूर : तालुक्यात देगलूर (उत्तर), इब्राहिमपूर, भक्तापूर, मंडगी, मानूर, कोकलगाव, शिळवणी या सात तलाठी सज्जांची निर्मिती करण्यात आली आहे.देगलूर शहर व परिसरासाठी पहिले एकच सज्जा होता़ आता देगलूर उत्तर सज्जाची निर्मिती करण्यात आली असून देगलूर उत्तर सज्जात देगलूर, देगाव ( खु.) व कारेगाव या गावांचा समावेश करण्यात आला आहे. इब्राहिमपूर हे गाव खानापूर सज्जात होते तर अल्लापूर हे गाव तडखेल सज्जात होते. आता इब्राहिमपूर सज्जात इब्राहिमपूर, अल्लापूर व निपाणी सावरगावचा समावेश आहे. भक्तापूर, पिंपळगाव, नागराळ, लिंगनकेरुर, रामपूर, होट्टल ही सहा गावे होट्टल सज्जात होते. आता भक्तापूर सज्जाची निर्मिती करण्यात आली असून या सज्जात भक्तापूर, पिंपळगाव व नागराळ या गावांचा समावेश आहे.मंडगी सज्जात मंडगी, कुरुडगी (बु. व खु.) टाकळी, वळग, नंरगल खु. (बे.) या गावांचा समावेश करण्यात आला आहे. पूर्वी मंडगी, कुरुडगी (बु़) नरंगल खु (बे.) ही गावे सांगवी उमर सज्जात होती़ तर कुरुडगी (खु़) व टाकळी, वळग हीे दोन गावे हनुमानहिप्परगा सज्जाअंतर्गत होती. मानूर सज्जाची नवनिर्मिती करण्यात आली आहे. पूर्वी मानूर हे गाव बेंबरा सज्जात येत होते. मानूर सज्जात फक्त मानूर गावाचाच समावेश आहे. कोकलगाव या नवीन सज्जात कोकलगाव, रमतापूर व खुतमापूर गावांचा समावेश आहे. पूर्वी कोकलगाव हे बिजलवाडी सज्जात, रमतापूर हे गाव येडूर सज्जात तर खुतमापूर हे गाव हणेगाव सज्जात होते. शिळवणी या नवीन सज्जाची निर्मिती करण्यात आली असून या सज्जात शिळवणी, तुंबरपल्ली व पुंजरवाडी गावांचा समावेश आहे. पूर्वी शिळवणी हे गाव वझर सज्जात, तुंबरपल्ली व पुंजरवाडी हे दोन गावे लोणी सज्जात होती.नवीन सज्जाच्या बाबतीत कुणाला हरकत घ्यावयाची असेल किंवा सूचना करावयाची असल्यास त्यांनी योग्य त्या कारणासह ८ सप्टेंबर २०१७ पर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयात हरकती नोंदवाव्यात, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ़ अरुण डोंगरे यांनी केले आहे.तालुक्यात पूर्वी ३५ तलाठी सज्जे होते़ आता त्यात सात सज्जाची वाढ झाल्याने एकूण ४२ सज्जे झाले आहेत. सात सज्जाची निर्मिती झाल्याने बºयाच तलाठ्यांचा ताण आता कमी होणार आहे. सात सज्जाची वाढ झाल्याने भविष्यात एक मंडळ वाढणार हे निश्चित आहे.
देगलूर तालुक्यात नवीन तलाठी सज्जे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 02, 2017 12:17 AM