नांदेड : जिल्हा परिषदेकडून पाणी टंचाईबाबत कोणतेही नियोजन केले जात नाही़ त्यामुळे अनेक गावांना पिण्याच्या पाण्यासाठी विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे़ जिल्हा परिषदेने आतापासून टंचाई आराखडा तयार करावा, अशी मागणी सदस्यांनी केली़जि़प़ च्या स्थायी समितीची सभा अध्यक्षा शांताबाई जवळगावकर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली़ यावेळी संभाव्या दुष्काळाच्या संदर्भात सदस्यांनी नियोजन करण्याची मागणी केली़ यावर्षी समाधानकारक पाऊस झाला नसल्याने जिल्ह्यातील अनेक नद्या, नाले, तलाव कोरडेच आहेत़ पावसाच्या लहरीपणामुळे खरिपाची पिकेही हातची गेली आहेत़ आतापासून पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ नागरिकांवर आली आहे़ अशा परिस्थितीत जिल्हा परिषद प्रशासन कोणतेही नियोजन करण्यास तयार नाही, असा आरोप सदस्यांनी केला़नायगाव तालुक्यातील मांजरम येथीली प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकाºयांनी आपला मनमानी कारभार सुरू केल्यामुळे रूग्णांना खाजगी रूग्णालयात उपचार घ्यावा लागत आहे़ या प्रकरणाची चौकशीची मागणी केली़ ग्रामीण भागातील गर्भवती महिलांना रूग्णालयाकडून तीन दिवसांचे भोजन देण्याचे आदेश असतानाही केवळ खिचडीच त्यांना देण्यात येत आहे़ जिल्ह्यातील मोडकळीस आलेल्या शाळा इमारतींचे तपासणी करून या इमारती पाडण्याची परवानगी द्यावी, आदी मागण्या करण्यात आल्या़
पाणी टंचाईचा आराखडा तयार करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 06, 2017 12:28 AM