छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यात दुसऱ्या दिवशीही जवळपास सर्वच जिल्ह्यांतील काही मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली आहे. मंगळवार ४ जुलै ते बुधवार ५ जुलै सकाळी ८ वाजेदरम्यान विभागातील १४ मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली. त्यानंतर बुधवार ५ जुलै ते गुरुवार सकाळी ८ वाजेपर्यंत विभागातील आठही जिल्ह्यांत पावसाने हजेरी लावली. ३७ मंडळांत दमदार पाऊस बरसल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
औरंगाबाद जिल्ह्यातील ३, जालन्यातील १, बीडमध्ये ६, लातूर १०, उस्मानाबाद २, नांदेड ८, तर परभणी, हिंगोलीतील प्रत्येकी ३ अशा ३७ मंडळांत अतिवृष्टी झाली आहे. विभागात ६ जुलै सकाळपर्यंत २५.५ मि.मी. पावसाची नोंद झाली. जून महिन्यात ५९ टक्के पावसाची तूट राहिली. जुलै महिन्यांत चांगले पर्जन्यमान झाले तर खोळंबलेल्या पेरण्यांना वेग येऊ शकेल.
या जिल्ह्यातील मंडळात बरसलाऔरंगाबाद : वैजापूर ७०.२५ मि.मी., बाबतारा ८०.७५ मि.मी., बाबाराम ६५.७५ मि.मीजालना : अंबड ७०.५० मि.मी.नांदेड : अमदपूर ९२.७५ मि.मी., मुखेड ६६.७५ मि.मी., जांम्ब ८४.२४ मि.मी., येवती ८६ मि.मी., जहूर ८६ मि.मी., चांदोल ७१ मि.मी., अंबुलगा ८६ मि.मी., मालकोळी ७१ मि.मी.,परभणी : पेढगाव ६८.७५ मि.मी., जाम्ब ६८.७५ मि.मी., केसापुरी ७२.५० मि.मी., ताडबोरगाव ६८.७५ मि.मी.हिंगोली : मालहिवरा ६७.२५ मि.मी., वसमत ९१.७५ मि.मी., हियातनगर ९१.७५ मि.मी.बीड : कडा १२०.५० मि.मी., सिरसदेवी ७७.७५ मि.मी., माजलगाव ८६ मि.मी., गंगामसला १३२ मि.मी., यु.वडगाव १०८ मि.मी., होल ७९ मि.मी.,लातूर : लातूर ७६.२५ मि.मी., बाभळगाव ७६.२५ मि.मी., हरनगुल ७६.२५ मि.मी., किनी ९१ मि.मी., शिरूर ६८ मि.मी., नागलगाव १२६.५० मि.मी., मोघा ११२.२५ मि.मी., चाकूर ६९.२५ मि.मी., बोरूळ ७५.५० मि.मी., जळकोट ७३ मि.मी.,उस्मानाबाद : जावळा ७०.२५ मि.मी., भूम ६८ मि.मी.