शिक्षण ः जिल्ह्यातील उपस्थिती वाढविण्याचे शाळांसमोर आव्हान
--
औरंगाबाद ः दहावीच्या वर्गात ६२.९८ टक्के तर बारावीच्या वर्गात ४७.४१ टक्के उपस्थिती आहे. पाचवी ते आठवी ५६.३९ टक्के आणि नववी ते बारावीमध्ये ५६.५६ टक्के उपस्थिती १२ फेब्रुवारीला होती. परीक्षा जवळ येत असताना अद्यापही पालक संभ्रमावस्थेत असल्याचे चित्र असल्याने शिक्षण विभागाची चिंता वाढली असून, विद्यार्थी उपस्थिती वाढविण्याचे आव्हान शाळांसमोर आहे.
बोर्ड परीक्षांच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. त्यामुळे परीक्षा जवळ येत असताना दहावीतील ६५ हजार १७० पैकी ४१ हजार ४६ विद्यार्थी उपस्थित होते. ही संख्या समाधानकारक वाढतेय; मात्र बारावीची पटसंख्या ४२ हजार ३११ असून, २० हजार ६० विद्यार्थी १२ फेब्रुवारीला उपस्थित होते. हे घटलेले प्रमाण चिंताजनक आहे. इंग्रजी खासगी शाळांकडून माहिती मिळत नसल्यानेही आकडेवारी घटलेली दिसत असल्याची शक्यता आहे. ही उपस्थिती वाढवण्यासाठी शाळांतून प्रयत्न होत आहे. तर सुरू न झालेल्या स्कूलबस, रिक्षांचाही परिणाम उपस्थितीवर जाणवत आहे.
याविषयी बोलताना शिक्षणाधिकारी डाॅ. बी. बी. चव्हाण म्हणाले की, ऑफलाइन व ऑनलाइन हे दाेन्ही पर्याय समाेर असल्याने अनेक पालक विद्यार्थी कोराेनाच्या पार्श्वभूमीवर ऑनलाइन तासिकेलाच पसंती देत असल्याचे दिसते.
---
पुन्हा शाळेची गोडी लावण्यासाठी
शिक्षक पालक संवादावर भर गरजेचा
---
ग्रामीणमध्ये सुमारे ८० ते ९० टक्के उपस्थितीचे प्रमाण असते; मात्र सध्या हे प्रमाण २० ते ३० टक्क्यांनी कमी आहे. त्यामुळे ही वाटचाल गळतीच्या दिशेने असून, गळतीचे उपस्थितीत रूपांतर करण्यासाठी पालक शिक्षक संवादावर भर द्यावा लागणार आहे. शाळांपासून दुरावलेल्या विद्यार्थ्यांनाही पुन्हा शाळेची गोडी लावण्याची गरज शिक्षकांतून व्यक्त होत आहे.
--
जिल्ह्यातील शाळांतील उपस्थितीची आकडेवारी
---
तालुका ः दहावी ः बारावी ः पाचवी ते आठवी ः नववी ते बारावी
शहरी भाग १ ः ५३.५१ ः ३४.९९ ः ५१.८८ ः ५५.०८
शहरी भाग २ ः ५४.९५ ः २५.१९ ः ४३.२९ ः ४४.४८
औरंगाबाद ग्रामीण ः ७०.३८ ः ५२.१७ ः ६१.८८ ः ६०.७५
गंगापूर ः ६५.४८ ः५०.४८ ः६३.९९ ः६१.३६ ः
कन्नड ः ६६.०९ ः ४६.१७ ः ६१.१७ ः५४.००
खुलताबाद ः ६९.८० ः ५४.८५ ः५८.६६ ः ५८.४२
पैठण ः ६३.४९ ः ५४.०१ ः ५९.१३ ः ५७.६८
सिल्लोड ः ६३.५७ ः ४४.५७ ः ६२.१९ ः ५१.५६
सोयगाव ः ६८.४२ ः ५९.७३ ः ५९.७६ ः ६४.२७
वैजापूर ः ६९.८८ ः ६६.९६ ः ६४.९० ः ६६.९३ (आकडेवारी टक्क्यांत)