गुरुवारी (दि.३१) सकाळी संपूर्ण गावातून कालिकामातेची मूर्ती व कलशाची शोभायात्रा काढण्यात आली. टाळ-मृदंगाच्या गजरात देवीचा नामघोष करीत गावकऱ्यांनी या सोहळ्यात सहभाग घेतला. नाशिक येथील वेदमूर्ती सूर्यकांत शास्त्री पिंपळे, चंद्रकांत शास्त्री पिंपळे, संजय शास्त्री जोशी, सार्थक शास्त्री जोशी या ब्रह्मवृंदाने मंत्रघोषात पूजन केले. सायंकाळी चार वाजता डोंगरनिवासिनी शिवमहाकाली शक्तिपीठाचे पीठाधीश रोहितपुरीजी महाराज यांच्या हस्ते देवीच्या मंदिरावर कलशारोहण करण्यात आले. पूर्णाहुतीने सोहळ्याची सांगता झाली. त्यानंतर भाविकांना महाप्रसादाचा लाभ मिळाला. सोहळ्याच्या यशस्वितेसाठी अंबादास अंभोरे, हरिरंग अंभोरे, साहेबराव अंभोरे, नारायण अंभोरे, विलास अंभोरे, शेनफडू भालेकर, शामराव अंभोरे, विलास अंभोरे, अंबादास सुस्ते, दिगंबर अंभोरे, बाळा मोरे यांनी परिश्रम घेतले.
फोटो : कालिकादेवीची मूर्ती