हिंगोली : केंद्र शासनाने यावर्षीच्या खरीप हंगामासाठी विविध कृषि उत्पादनाच्या सुधारित किमान आधारभूत किमती प्रतिक्विंटलप्रमाणे जाहीर केल्या आहेत, अशी माहिती कृषि विभागाने दिली आहे. मात्र सध्या नव्या हंगामातील उडीद, मूग यापेक्षा अत्यंत कमी भावात विकावे लागत असल्याचे चित्र आहे.यात धानासाठी १५५0 ते १५९0 रुपये, ज्वारी हायब्रिड-१७00, मालदांडी-१७२५, बाजरी-१४२५, मका-१४२५, रागी-१९00, तूर- ५४५0, उडीद-५४00, मूग-५५७५, भुईमूग- ४४५0, सूर्यफूल-४१00, तीळ-५३00, कापूस मध्यम धागा ४0२0, लांब धागा-४३२0, सोयाबीन-३0५0, कारळ ४0५0 असा प्रतिक्ंिवटल आधारभूत भाव जाहीर केला आहे.यामधील या हंगामातील उडीद, मूग बाजारात विक्रीला येत आहेत. तीन हजारांपासून ते साडेचार हजारांपर्यंत दर मिळत आहेत. अधून-मधून एखाद्या दोन शेतकºयांना पाच हजारांवर दर मिळाला. त्यामुळे शासनाने जाहीर केलेल्या या दराचा शेतकºयांना प्रत्यक्ष लाभ होण्यासाठी शासनाने हमीभाव खरेदी केंद्र उघडण्याची गरज आहे. विशेष म्हणजे सोयाबीनला मुळातच कमी भाव जाहीर केल्याची भावना असून शासनाचा हा दर असेल तर व्यापारी काय दर देतील, असा प्रश्न उपस्थित होत आहे. कधीकाळी सहा हजार भाव देण्याची मागणी करणाºया पक्षाची सत्ता असताना ही स्थिती आहे.
तुरीचा भाव ५४५0 रुपये जाहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2017 12:02 AM