लोकमत न्यूज नेटवर्ककुरूंदा : परिसरात केळीच्या उत्पादनात वाढ झाली असून सरासरी १२०० ते १३०० रूपये प्रतिक्विंटलपर्यंत भाव मिळत आहे. कुरूंदा भागात यावर्षी केळीच्या उत्पादनात मोठी वाढ झाली असून परिसरातील केळी दुसऱ्या राज्यातही विक्रीसाठी जात असल्याचे बघावयास मिळत आहे.हिंगोली जिल्ह्यात सर्वाधीक केळीचे उत्पादन डोंगरकडा, कुरूंदा, गिरगाव, दांडेगाव, सुकळीवीर, जामगव्हाण, रेडगाव आदी भागात घेतले जाते. या भागातून इसापूर धरणाचा कालवा गेलेला असल्यामुळे येथील सिंचन व्यवस्थेमुळे बागायती क्षेत्र निर्माण झाले आहे. रमजान महिन्यात बाजारपेठेत केळीला मोठी मागणी होती. त्यावेळी केळीचे दर वधारले होते. त्या तुलनेत सरासरी सध्याच्या सरासरीत केळीला चांगला भाव मिळत असल्याचे दिसून येत आहे. बाजारपेठेत केळीला सध्या १२०० ते १३०० रूपये क्विंटल भाव मिळत
केळीला १३०० रूपयांपर्यंत भाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2017 12:14 AM