शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
2
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
3
विशेष लेख: गणिते बिघडली, झोप उडाली.. युती की आघाडी?
4
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
5
... म्हणून मोदी सरकारला आहे सरकारी कंपन्यांचा अभिमान, जाणून घ्या गेल्या ९ वर्षांत किती झाली प्रगती
6
Maharashtra Election 2024 Live Updates: 'लाडकी बहीण'सारख्या योजनांचे सरकारने नीट नियोजन केलं आहे- मुख्यमंत्री शिंदे
7
हमीभावाबाबत पंतप्रधान मोदींची महत्त्वाची घोषणा; राज्यातील हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा
8
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
9
Ola Electric CCPA Notice : Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
10
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
11
"एक माणूस म्हणून तो...", इब्राहिमसोबतच्या नात्यावर पलक तिवारीने केलं होतं भाष्य
12
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
13
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
14
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
15
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
16
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल
17
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
18
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
20
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...

हमीभाव वाढताच बाजारात महागल्या डाळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 08, 2018 1:28 AM

केंद्र सरकारने खरीप हंगामातील १४ पिकांच्या हमीभावात मोठी वाढ केली; मात्र त्याचा त्वरित परिणाम खुल्या बाजारपेठेत दिसून आला. सर्व प्रकारच्या डाळी क्विंटलमागे १०० ते १ हजार रुपयांदरम्यान महागल्या आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कऔैरंगाबाद : केंद्र सरकारने खरीप हंगामातील १४ पिकांच्या हमीभावात मोठी वाढ केली; मात्र त्याचा त्वरित परिणाम खुल्या बाजारपेठेत दिसून आला. सर्व प्रकारच्या डाळी क्विंटलमागे १०० ते १ हजार रुपयांदरम्यान महागल्या आहेत.केंद्र सरकारने बुधवारी कापसापासून ते तुरीपर्यंतच्या पिकाचे हमीभाव वाढविले आहेत. यात उडीद २०० रुपयांनी वाढून ५६०० रुपये, ज्वारी ७३० रुपयांनी वाढवून २४३० रुपये, तर मुगाच्या हमीभावात १४०० रुपये वाढ करीत ६९७५ रुपये दिला आहे. हा हमीभाव शेतकऱ्यांना मिळाला तर त्यांच्या उत्पन्नात भर पडणार आहे; मात्र हमीभाव वाढीच्या नावाखाली व्यापाºयांनी आताच डाळींचे भाव वाढविले आहेत. व्यापारी आणि डाळ मिल चालकांकडे गतवर्षीच्या हमीभावानुसार खरेदी केलेली डाळ आहे. मागील हंगामातील डाळी व्यापाºयांकडे मोठ्या प्रमाणावर आहेत; मात्र आता सरकारने शेतकºयांना वाढीव हमीभाव जाहीर केल्यानंतर हमीभाव वाढीच्या नावाखाली मागील हंगामातील डाळींचे भाव आता वाढविण्यात आले आहेत. या प्रकारामुळे साठेबाजांनी आपले उखळ पांढरे करणे सुरू केले आहे.अशी झाली दरवाढमागील हंगामातील मूग डाळ ८०० ते १००० रुपयांनी कडाडून ६८०० ते ७२०० रुपये प्रतिक्विंटल दराने शुक्रवारी आणि शनिवारी विकली जात होती. हरभरा डाळ ३०० रुपयांनी वधारून ४२०० ते ४५०० रुपये, मसूर डाळ, २०० रुपयांनी महागून अनुक्रमे ४५०० ते ५२०० रुपये व ४६०० ते ४८०० रुपये, तर तूर डाळीत १५० रुपयांनी वाढ होत ५३०० ते ५५०० रुपये, तर मठ डाळ १०० रुपयांनी वधारून ५२०० ते ५४०० रुपये प्रतिक्विंटल विक्री होत आहे.व्यापाºयांनी सांगितले की, डाळींच्या भावात आणखी २०० ते ३०० रुपयांची वाढ होऊ शकते. परिणामी याचा फटका सणासुदीच्या दिवसांत सर्वसामान्य ग्राहकांना बसणार आहे. नवीन मूग व उडीद डाळ बाजारात येण्यास अडीच ते तीन महिन्यांचा कालावधी लागणार आहे. तूर डाळ डिसेंबर-जानेवारीत, तर हरभरा डाळ मार्च महिन्यात बाजारात येईल. कर्नाटकात उन्हाळी मूग मोठ्या प्रमाणात आल्याने मध्यंतरी मुगाचे भाव घटले होते.मागील हंगामातील मूग, तूर, उडीद, मठ, हरभरा, मसूर शेतकºयांनी विकून टाकली आहे. आता सर्व डाळींचा बंपर साठा डाळ मिल व साठेबाजांच्या हातात आहे. हमीभावाचा फायदा आगामी खरीप हंगामात पीक आल्यानंतरच होणार आहे; पण त्याआधीच मागील वर्षीच्या कमी भावात खरेदी केलेल्या डाळी चढ्या भावात विकून साठेबाज ग्राहकांना चुना लावत आहेत.

टॅग्स :MarketबाजारAgriculture Sectorशेती क्षेत्र