लोकमत न्यूज नेटवर्कउस्मानाबाद : जिल्ह्यातील ग्रामीण भागातील नागरिकांना आरोग्याची सेवा पुरविणारे बहुतांश प्राथमिक आरोग्य केंद्रे सध्या सलाईनवर आहेत़ रिक्तपदांचा प्रश्न, सुविधांचा अभाव, वेळेवर उपलब्ध नसलेले अधिकारी, कर्मचारी असे एक ना अनेक प्रश्न या आरोग्य केंद्रांसमोर आहेत़ रात्रीच्यावेळी उपकेंद्रे तर केवळ नावापुरतीच असतात़ सलाईनवरील या आरोग्य केंद्रांमध्ये उपचारासाठी जाणाऱ्या रुग्णांसह नातेवाईकांना गैरसोयीचा सामना करावा लागतो़ विशेषत: रात्रीच्यावेळी उपचार मिळतील याची शाश्वती नसल्याचे सोमवारी रात्री केलेल्या पाहणीत समोर आले़काक्रंबा : तुळजापूर तालुक्यातील सलगरा (दि़) येथील प्राथमिक आरोग्य केंद्र विविध असुविधांमुळे सलाईनवर असल्याचे चित्र सोमवारी रात्री केलेल्या पाहणीत दिसून आले़ येथे आलेल्या रुग्णांवर डॉक्टरांअभावी कर्मचाऱ्यांनीच औषधोपचार केले़सलगरा (दि) प्राथमिक आरोग्य केंद्रात दोन निवासी वैद्यकीय अधिकाऱ्यांसह एकूण १७ जागा आहेत़ मात्र, १७ पैकी एका वैद्यकीय अधिकाऱ्यांसह सहा जागा गत पाच वषार्पासून रिक्त आहेत़ त्यातील एक कर्मचारी तर गत दीड महिन्या पासून रजेवर आहे़ रिक्त पदांमुळे उर्वरित अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कामकाजाचा ताण येताना दिसत आहे़ वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांची निवास्थाने कालबाह्य झाली आहेत़ तर पडझड झाल्याने पावसाळ्यात इथे गळती लागते़ त्यामुळे इथे रात्रीच्यावेळी मुख्यालयी एकही अधिकारी, कर्मचारी राहत नाही़ परिणामी रुग्णांना घेऊन नातेवाईकांना तुळजापूर किंवा लोहारा गाठावे लागत आहे़ सोमवारी रात्री आलेल्या दोन्ही रुग्णांवर परिचारिकांनीच औषधोपचार केल्याचेही दिसून आले़
प्राथमिक आरोग्य केंद्रे सलाईनवर
By admin | Published: May 17, 2017 12:21 AM