औरंगाबाद : जयभवानीनगरातील एका दुमजली इमारतीत चालणारा देह विक्रयाचा अड्डा मुकुंदवाडी पोलिसांनी मंगळवारी उद्ध्वस्त केला. याप्रकरणी आन्टी, दलालास अटक करण्यात आली, तर तीन महिलांना ताब्यात घेण्यात आले.जयभवानीनगरातील गल्ली नं. १ मध्ये संगीता इंगळे (५०) या महिलेची दुमजली इमारत आहे. गेल्या काही दिवसांपासून येथे वेश्या व्यवसाय सुरूअसल्याची माहिती मुकुंदवाडी ठाण्याचे निरीक्षक नाथा जाधव यांना मिळाली होती. वेश्या व्यवसायामुळे या भागात आंबटशौकिनांची वर्दळ वाढली होती. अनेक ग्राहक दारूच्या नशेत जागा मिळेल तेथे वाहने लावीत तसेच कोणाच्या घराचे दरवाजे ठोठावत असत. राजू कदम (३०) हा दलाल ग्राहकांचा शोध घेत असे. सहायक पोलीस आयुक्त मीना मकवाना, नाथा जाधव, फौजदार मीरा चव्हाण, बेले यांच्या पथकाने मंगळवारी दुपारी एका पंटरमार्फत दलाल राजू कदम याच्याशी संपर्क साधला. विशेष म्हणजे कदम हा याच इमारतीत भाडेकरू म्हणून वास्तव्यास आहे. पतीपासून विभक्त राहणारी संगीता इंगळे तसेच (पान ५ वर)चार महिन्यांचा चिमुकलादेह व्यापारासाठी एक महिला आपल्या चार महिन्यांच्या मुलासह आन्टीच्या अड्ड्यावर येत होती. ग्राहकाशी सौदा झाल्यानंतर आन्टी या चिमुकल्यास सांभाळत होती. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने काही महिला हा व्यवसाय करीत होत्या. आन्टी आणि दलालाचे मोबाईल जप्त करण्यात आले असून, त्यांच्या संपर्कात असणाऱ्या ग्राहकांची पोलीस माहिती घेत आहेत.
देहविक्रयाच्या अड्ड्यावर छापा
By admin | Published: September 21, 2016 12:12 AM