शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
2
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
3
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
4
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
5
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
6
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
7
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
8
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
9
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
10
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
11
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
12
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
13
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
14
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
15
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
17
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
18
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
19
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
20
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...

जुगार अड्ड्यावर छापा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2017 12:34 AM

आखाडा बाळापूर : विशेष पोलीस महानिरीक्षकाच्या आदेशाने नियुक्त लातूर पोलिसांच्या पथकाने बाळापूर येथील तीन जुगार अड्ड्यांवर धाड टाकली.

लोकमत न्यूज नेटवर्कआखाडा बाळापूर : विशेष पोलीस महानिरीक्षकाच्या आदेशाने नियुक्त लातूर पोलिसांच्या पथकाने बाळापूर येथील तीन जुगार अड्ड्यांवर धाड टाकली. यात २८ जणांना अटक केली तर ६० हजार रोकड, जुगाराचे साहित्य, दोन संगणक संच जप्त केले आहेत. बसस्थानक परिसरातील दोन जुगार अड्ड्यावरील धाडीमुळे मोठा जमाव जमला होता. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार २२ जुलै रोजी दुपारी तीनच्या सुमारास ३ जुगार अड्ड्यावर तर पोलीस ठाण्याच्या प्रवेशद्वाराजवळील एका अड्ड्यावर धाड पडली. नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक चिरंजीव प्रसाद यांच्या आदेशानुसार लातूर जिल्ह्यातील अहमदपूर येथील उपविभागीय अधिकारी श्रीधर पवार यांच्या नेतृत्वाखाली फौजदार पंडित सिरसे, प्रवीण उदे, पोलीस कर्मचारी माने, नरहरे, धाकपाडे, रेचवाडे, सय्यद, सय्यद पाटील, शेख, पाटील असे ११ जणांचे पथक साध्या वेशात आले. छाप्यामध्ये रोख ६० हजार रुपये, संगणकाचे दोन संच, जुगार साहित्य जप्त केले. तर जुगार अड्ड्यावरुन फुलाजी नेमाजी गुहाडे, पांडुरंग नारायण राऊत, मारोती गणपत शेळके, तुकाराम भुजंगराव धनवे, प्रल्हाद शेषेराव अंभोरे, देवीदास यादवजी थोरात, नामदेव नारायण फोपसे, अशोक उत्तमराव डुकरे, सदाशिव सोनबा कुंडे, गजानन बाबाराव आम्ले, नामदेव काशिबा मुकाडे, माधव मारोती शेळके, श्रीराम सखाराम महाुरे, माधव बापुजी डुकरे, गोमाजी तुकाराम डुकरे, मुक्ताजी विठ्ठल आवळे, शेख जावेद शेख जब्बार, जळबा विठ्ठल कणके, बाबाराव शंकर लाखाडे, राजेश माधवराव खिल्लारे, नरेंद्र सोनबा पतंगे, किशन अशोकराव नरवाडे, गजानन गणपती कांबळे, कैलास दिगंबर पुरी, राजू शंकर बेनगर, अनिल माधवराव पानपट्टे, देवराव मोतीराम नरवाडे, प्रकाश डुलाजी रणवीर अशा एकूण २८ जणांना अटक केली.